Jump to content

"करंज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:karanj_zad.jpg|thumb|Right|करंज / करंजी चे झाड]]

[[चित्र:karanj_pane.jpg|thumb|Right|करंज / करंजी ची पाने]]

नावे:-
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या झाडास [[करंजी (खाद्यपदार्थ)|करंजीच्या]] आकाराची फळे लागतात म्हणून याचे नाव करंज पडले.या फळांपासून निघणारे तेल हे आयुर्वेदात औषधी म्हणून वापरतात.त्यास 'करंजीचे तेल' असे म्हणतात.
* मराठी : करंज
{{विस्तार}}
* संस्कृत - करंज; गौरा; चिरबिल्वक; नक्तमाल; पूतिक; प्रकीर्य; स्निग्धपत्र
* इंग्रजी : Pongam; Indian Beach
* लॅटिन : Pongamia pinnata
* गुजराथी : कनझी; कानजी
* हिंदी : करंज; कांजा; किरमल; पपर
* कानडी : हुलीगिली; होंगे

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या मध्यम उंचीच्या झाडास [[करंजी (खाद्यपदार्थ)|करंजीच्या]] आकाराची फळे लागतात म्हणून याचे नाव करंज पडले.या फळांपासून निघणारे तेल हे आयुर्वेदात औषधी म्हणून वापरतात.त्यास 'करंजीचे तेल' असे म्हणतात.

करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पोंगॅमिया पिन्नाटा’ असे आहे. सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते. काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे.

करंज साधारण १५ ते २० मीटर उंचीपर्यंत वाढतो, पण काही ठिकाणी ३० मीटर उंचीपर्यंत वाढला आहे. खोड काहीसे पसरट असते. खोडाची साल मऊ, गुळगुळीत किंवा गाठीयुक्त असून रंगांनी हिरवी-राखाडी असते. झाडाचा पर्णसंभार पसरणारा असतो. पाने एकांतरित, संयुक्त व विषमपर्णी असतात. ६ इंच ते १२ इंच लांब असणाऱ्या पानामध्ये पाच, सात किंवा नऊ लंबगोलाकार, टोकदार पर्णिका असतात. ती अत्यंत तुकतुकीत, मऊ, मुलायम, चमकदार, पोपटी-हिरव्या, तजेलदार वर्णाची असतात, म्हणूनच या झाडाच्या चमकत्या पालवीवरून त्याच्या ‘स्निग्धपत्र’ नावाची सार्थता पटते.

साधारण एप्रिल ते जूनमध्ये झाड फुलांनी बहरून जाते. पान आणि खोडाच्या खोबणीमधून मंजिऱ्या बाहेर पडतात. त्यावर अतिशय लहान देठाच्या, तपकिरी कळ्या बाहेर पडतात. कळ्या उमलून त्याचे फिक्या गुलाबी, जांभळट फुलांत रूपांतर होते. या फुलांच्या तुऱ्यांना मंद वास असतो. काही ठिकाणी ही फुले रंगाने हिरवट पांढरी किंवा दुधी पांढरीही आढळतात. फुलात पाच पाकळ्या असतात, त्यापकी चार गुलाबी रंगाच्या असतात तर पाचवी पाकळी हिरव्या रेषांनी मढलेली असते. फुले कोमेजण्यापूर्वीच खाली गळतात.

फुले ओसरल्यावर पाठोपाठ येतात पिवळसर, टणक, चपटय़ा करंजीच्या आकारासारख्या शेंगा. बियांपासूनच तेल काढतात. ‘करंजतेल’ म्हणून हे प्रसिद्ध आहे. हे तेल तीव्र जंतुनाशक आहे. यामध्ये ‘करंजीन’ व ‘पॉन्गेमॉल’ ही द्रव्ये आहेत. प्राचीन काळापासून विविध त्वचारोग, सर्पदंश, कृमी व दूषित जखमा भरण्यासाठी वापरले जाते. पानांचा उपयोग संधिवातावर करतात. जंतुनाशक म्हणून याची पेंड बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. दिव्यामध्ये जाळण्यासाठी याचा उपयोग करतात. साबण बनविण्यासाठीही आणि वंगण म्हणूनही याचा वापर करतात. करंज हा रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी एक चांगला वृक्ष आहे.

[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]

१८:००, २८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

करंज / करंजी चे झाड
करंज / करंजी ची पाने

नावे:-

  • मराठी : करंज
  • संस्कृत - करंज; गौरा; चिरबिल्वक; नक्तमाल; पूतिक; प्रकीर्य; स्निग्धपत्र
  • इंग्रजी : Pongam; Indian Beach
  • लॅटिन : Pongamia pinnata
  • गुजराथी : कनझी; कानजी
  • हिंदी : करंज; कांजा; किरमल; पपर
  • कानडी : हुलीगिली; होंगे

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या मध्यम उंचीच्या झाडास करंजीच्या आकाराची फळे लागतात म्हणून याचे नाव करंज पडले.या फळांपासून निघणारे तेल हे आयुर्वेदात औषधी म्हणून वापरतात.त्यास 'करंजीचे तेल' असे म्हणतात.