"के.बी. पोवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्रा. डॉ. कृष्णप्रताप भगवंतराव पोवार (जन्म : २० डिसेंबर, इ.स. १९३७; म... |
(काही फरक नाही)
|
१२:१४, २५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
प्रा. डॉ. कृष्णप्रताप भगवंतराव पोवार (जन्म : २० डिसेंबर, इ.स. १९३७; मृत्यू :पुणे, २२ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एक भूशास्त्र संशोधक होते
डॉ. पोवार यांनी नागपूर विद्यापीठामधून भूशास्त्रामध्ये बी.एस्सी आणि एम.एस्सी पदवी मिळविली होती. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी भूशास्त्रामध्ये पीएच्डी केल्यानंतर त्यांना फुलब्राइट स्कॉलरशिपही मिळाली होती. बनारस हिंदू विद्यापीठ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठात भूशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९८६ साली ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नवी दिल्लीच्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे (एआययू) सरचिटणीस म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले होते. २००२ मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी उच्चशिक्षणाशी निगडीत विविध संघटना आणि संस्थांसाठी सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. आकुर्डीच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही ते काम पाहात होते.