"पिंपळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
पिंपळ हे भारतीय उपखंडात उगवणार्‍या एका भल्या थोरल्या वृक्षाचे नाव आहे. या वृक्षाचा विस्तार फार मोठा असतो.

कोठेही, कसाही, भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढणारा आपल्या परिचयाचा वृक्ष पिंपळ. हा भारतीय वृक्ष ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषत: हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा व कोलकोता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. अश्वत्थ हेही त्याचेच नाव.
== भारतीय संस्कृतीतील महत्त्व ==

पिंपळाला भारतीय समाजात फारच मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदु संस्कृतीत,ज्या वृक्षांना 'तोडू नये' असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वस्थ(पिंपळाखाली असलेला) [[मारुती]]चे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा [[पुष्य]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
या वृक्षाची उंची १० ते १५ मीटपर्यंत वाढते. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. पाने हृदयाकार, लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी, तांबूस नंतर हिरव्या रंगाची, आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना, कानांना सुखावणारी असतात. अग्रस्थ अंकुर, उपपर्णानी झाकलेला, उपपर्णे लांबट तांबूस-गुलाबी असतात. हिरव्या रंगाची फुले, अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात याचे पुष्पाशय (फळासारखा दिसणारा भाग) पानाचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांदीवर येतो. पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो. यामध्ये तीन पाकळ्यांची नरपुष्पे व पाच पाकळ्याची मादीपुष्पे असतात. यावर सतत कीटक बसतात. याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात. ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात. ही फळे पचण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया, पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात.

हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे. हा कोठेही, कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते. तो घराजवळ असल्यास घराच्या भिंती, वासे, खांब यामधे वाढून घराला हानी निर्माण करतो.

==औषधी व अन्य वापर==
पिंपळाच्या झाडापासून ‘लाख’ बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे करतात. उदरशूल व पोटाचे अन्य विकार यावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालींचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो. बौद्धभिक्षू या रंगाने आपले वस्त्र रंगवतात. हडाप्पा अणि मोहोंजेदाडोच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती आहेत.

== भारतीय संस्कृतीतील धार्मिक समजुती ==
पिंपळाला भारतीय समाजात फारच मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदु संस्कृतीत,ज्या वृक्षांना 'तोडू नये' असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ [[मारुती]]चे (पिंपळाखाली असलेल्यामारुतीचे) [[मारुती]]चे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा [[पुष्य]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.

== बौद्ध धर्मातील पिंपळाचे महत्त्व ==
== बौद्ध धर्मातील पिंपळाचे महत्त्व ==
गौतम बुद्धांनी बिहार मधील बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले असत, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हापासून याला बोधिवृक्ष असे म्हणू लागले.

== औषधी महत्त्व ==
पिंपळ हा एक औषधी वृक्ष आहे.(??)

[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]

००:१३, १७ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

पिंपळाचे झाड
पिंपळाचे पान

पिंपळ हे भारतीय उपखंडात उगवणार्‍या एका भल्या थोरल्या वृक्षाचे नाव आहे. या वृक्षाचा विस्तार फार मोठा असतो.

कोठेही, कसाही, भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढणारा आपल्या परिचयाचा वृक्ष पिंपळ. हा भारतीय वृक्ष ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषत: हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा व कोलकोता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. अश्वत्थ हेही त्याचेच नाव.

या वृक्षाची उंची १० ते १५ मीटपर्यंत वाढते. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. पाने हृदयाकार, लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी, तांबूस नंतर हिरव्या रंगाची, आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना, कानांना सुखावणारी असतात. अग्रस्थ अंकुर, उपपर्णानी झाकलेला, उपपर्णे लांबट तांबूस-गुलाबी असतात. हिरव्या रंगाची फुले, अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात याचे पुष्पाशय (फळासारखा दिसणारा भाग) पानाचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांदीवर येतो. पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो. यामध्ये तीन पाकळ्यांची नरपुष्पे व पाच पाकळ्याची मादीपुष्पे असतात. यावर सतत कीटक बसतात. याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात. ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात. ही फळे पचण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया, पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात.

हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे. हा कोठेही, कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते. तो घराजवळ असल्यास घराच्या भिंती, वासे, खांब यामधे वाढून घराला हानी निर्माण करतो.

औषधी व अन्य वापर

पिंपळाच्या झाडापासून ‘लाख’ बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे करतात. उदरशूल व पोटाचे अन्य विकार यावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालींचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो. बौद्धभिक्षू या रंगाने आपले वस्त्र रंगवतात. हडाप्पा अणि मोहोंजेदाडोच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती आहेत.

भारतीय संस्कृतीतील धार्मिक समजुती

पिंपळाला भारतीय समाजात फारच मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदु संस्कृतीत,ज्या वृक्षांना 'तोडू नये' असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्यामारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

बौद्ध धर्मातील पिंपळाचे महत्त्व