Jump to content

"शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे कवयित्री बहिणाबाई न...
(काही फरक नाही)

१३:४६, ७ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे कवयित्री बहिणाबाई नगरी (आयएमए सभागृह, धुळे) येथे पहिले शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन ६-७ फेब्रुवारी २०१६ या काळात झाले.

संमेलनाध्यक्षा भूलतज्ञ डॉ. अलका मांडके होत्या. संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, खासदार डॉ.सुभाष भामरे, आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर, माजी अध्यक्ष डॉ.अशोक आढाव, डॉ.अविनाश भोंडवे, डॉ.अशोक तांबे, डॉ.रवींद्र टोणगावकर, सुषमा दाते, धुळ्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखाध्यक्ष डॉ.मीना वानखेडकर वगैरे उपस्थित होते.

या संमेलनादरम्यान डॉ.वर्षा सिधये यांचे ‘रंगोत्सव’, डॉ. अमित बिडवे यांचे दिल..दोस्ती..डॉक्टरी, डॉ.अलका कुलकर्णी यांचे अनुवादित पुस्तक ‘भुलवा’ (हिंदी) व डॉ.रवींद्र टोणगावकर लिखीत ‘माझी अध्यात्मिक वाटचाल-गूढाकडून वास्तवाकडे’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.


पहा : साहित्य संमेलने