"मानकरकाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:


==मानकरकाकांचे शिष्य==
==मानकरकाकांचे शिष्य==
मानकरकाकांचे राज कांबळे, श्रीकांत पाटील आदीं शिष्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार बनले. त्यांची चित्रे लाखोंच्या किमतीत विकत घेतली जातात.


==सामाजिक कार्य==
==सामाजिक कार्य==

००:२३, ३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

कृष्णा लक्ष्मण मानकर ऊर्फ मानकरकाका (जन्म : भायखळा-मुंबई, इ.स.१९३८; म्रूत्यू : मुलुंड-मुंबई, २८ नोव्हेंबर, इ,स, २०१५) हे मराठी चित्रकार आणि ‘टॉनिक’ या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक होते.

रेल्वेतील प्रवास असो किंवा एखादा कार्यक्रम वा संमेलन असो, कोणत्याही ठिकाणी हातात कागद-पेन्सिल घेऊन अगदी तन्मयतेने ते रेखाचित्र रेखाटत असत. कार्यक्रम सुरू असतानाच ते अनेकांची रेखाचित्रे रेखाटून त्यांना भेट देत असत. नंतर हळून खांद्याला लावलेल्या शबनममधून "टॉनिक‘चा दहा रुपयांचा अंक काढून देत असत. समोरच्या माणसाची कळी खुलली की त्यांना समाधान मिळत असे.

टॉनिक

मानकरकाका यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. या प्रभावातूनच त्यांनी मुलांवर संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून १९७९पासून ‘टॉनिक’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. गेली ३६ वर्षे अथकपणे ‘टॉनिक’ या दिवाळी अंकाचे त्यांनी वेळोवेळी पदराला खार लावून आणि वेळ पडल्यावर बायकोचे दागिने विकून नियमित प्रकाशन केले.

’टॉनिक’च्या अंकाचा दर्जा आणि छपाईबाबतही मानकरकाका काटेकोर असत. वेगवेगळे विषय अत्यंत कल्पकतेने त्यांनी ‘टॉनिक’मधून हाताळले. चित्रकला नसानसात भिनलेल्या या कलावंताने "टॉनिक‘च्या अंकात एखाद्या विषयावरील विशेषांक काढताना त्यांनी अनेक प्रयोग केले.लेखकांकडून साहित्य आणण्यासाठी ते लांबचाही प्रवास आनंदाने करीत. अंकाचे गठ्ठे स्वत: वाहत असत. एवढे करूनही अंक नुकसानीतच जात असे; पण त्याची फिकीर न करता पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने मानकरकाका नव्या अंकाची जुळवाजुळव करीत.

मानकराकाकांची निरलस वृत्ती आणि प्रामाणिकपणा बघूनच डॉ. जयंत नारळीकर ते डॉ. विजया वाड अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या अंकासाठी कित्येक वर्षे आवर्जून लेखन केले.

मानकरकाकांचे शिष्य

मानकरकाकांचे राज कांबळे, श्रीकांत पाटील आदीं शिष्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार बनले. त्यांची चित्रे लाखोंच्या किमतीत विकत घेतली जातात.

सामाजिक कार्य

भारदस्त आवाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले मानकरका कलावंत आहेत, हे सहज जाणवायचे. चित्रकला, साहित्य आणि लहान मुले ही त्यांची आवड. कलाशिक्षक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी लागावी यासाठी ‘बालनुक्कड’सारख्या स्पर्धा ठिकठिकाणी त्यांनी भरवल्या. यासाठी खूप पायपीटही केली. उत्कृष्ट चित्रांना ते पारितोषिकही देत होते. साहित्यिक चंद्रकांत खोत, दादा गावकर हे त्यांचे गुरू होते. कामगारांच्या मुलांसाठी स्थापन झालेल्या व झटणार्‍या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ या संस्थेसाठी काकांनी ६० वर्षे काम केले.

लेखन

  • देवचार (आत्मचरित्र)
  • पु.ल. देशपांडे यांच्या ‘वयम् मोठम् खोटम्’ या एकांकिकेचा हिंदी अनुवाद

पुरस्कार आणि सन्मान

  • ’टॉनिक’च्या दिवाळी अंकांना ३६ वर्षांत ५६ पुरस्कार मिळाले.
  • मानकरकाकांच्या आठवणी सांगणारे ’मानकरकाका’ हे पुस्तक बोरीवलीच्या ’फुलराणी’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन काकांचे विद्यार्थी राज कांबळे आणि टॉनिक परिवारातील लेखकांनी आणि चित्रकारांनी केले आहे. डॉ. वीणा सानेकर व राजेश दाभोळकर या लेखसंग्रहाचे संपादक आहेत.