Jump to content

"मानकरकाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कृष्णा लक्ष्मण मानकर ऊर्फ मानकरकाका (जन्म : भायखळा-मुंबई, इ.स.१९३८;...
(काही फरक नाही)

००:२०, ३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

कृष्णा लक्ष्मण मानकर ऊर्फ मानकरकाका (जन्म : भायखळा-मुंबई, इ.स.१९३८; म्रूत्यू : मुलुंड-मुंबई, २८ नोव्हेंबर, इ,स, २०१५) हे मराठी चित्रकार आणि ‘टॉनिक’ या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक होते.

रेल्वेतील प्रवास असो किंवा एखादा कार्यक्रम वा संमेलन असो, कोणत्याही ठिकाणी हातात कागद-पेन्सिल घेऊन अगदी तन्मयतेने ते रेखाचित्र रेखाटत असत. कार्यक्रम सुरू असतानाच ते अनेकांची रेखाचित्रे रेखाटून त्यांना भेट देत असत. नंतर हळून खांद्याला लावलेल्या शबनममधून "टॉनिक‘चा दहा रुपयांचा अंक काढून देत असत. समोरच्या माणसाची कळी खुलली की त्यांना समाधान मिळत असे.

टॉनिक

मानकरकाका यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. या प्रभावातूनच त्यांनी मुलांवर संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून १९७९पासून ‘टॉनिक’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. गेली ३६ वर्षे अथकपणे ‘टॉनिक’ या दिवाळी अंकाचे त्यांनी वेळोवेळी पदराला खार लावून आणि वेळ पडल्यावर बायकोचे दागिने विकून नियमित प्रकाशन केले.