Jump to content

"बंडगार्डन पूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बंडगार्डन पूल हा पुण्यातील मुळा-मुठा नदीवर बांधलेला एक पूल आहे. य...
(काही फरक नाही)

२३:०१, १४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

बंडगार्डन पूल हा पुण्यातील मुळा-मुठा नदीवर बांधलेला एक पूल आहे. याचे जुने नाव फिट्झगेराल्ड पूल असे आहे. भारतातील ब्रिटिश राजवटीत इ.स. १८६७ साली हा पूल बांधला. हा दगडी आणि रुंद कमानी असलेला पुण्यातील पहिला पूल होता. या पुलाचे बांधकाम Captain Robert S. Sellon या इंजिनिअरने केले होते. पुलाला मुंबईचे १८६७ ते १८७२च्या दरम्यान गव्हर्नर असलेले William Robert Vesey Fitzgerald यांचे नाव देण्यात आले होते. बांधकामाला त्या वेळी दोन लाख रुपये खर्च आला होता.

पुलावर सिंहाच्या दोन दगडी प्रतिमा आहेत. पूल जुना झाल्यानंतर त्याचा वापर कमी व्हावा म्हणून २०१३ साली त्याला समांतर असा एक पूल बांधण्यात आला, त्या पुलाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. आता या पुलावर पाश्‍चात्य देशांच्या धर्तीवर खुले कलादालन (आर्ट प्लाझा) साकारणार आहे.