Jump to content

"वृषाली किन्हाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. वृषाली किन्हाळकर या मराठवाड्यातील एक मराठी लेखिका आहे्त. त्य...
(काही फरक नाही)

२३:५४, ५ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

डॉ. वृषाली किन्हाळकर या मराठवाड्यातील एक मराठी लेखिका आहे्त. त्यांचे पती डॉ. माधवराव भुजंगराव किन्हाळकर हे भोकर मतदारसंघातून निवडले जाणारे आमदार आहेत.

स्वतः डॉ. वृषाली किन्हाळकर या अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेल्या स्‍त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या नांदेड येथे प्रॅक्टिस करतात. याशिवाय त्या एक संवेदनशील कवयित्री आहेत. त्यांच्या दोन कवितासंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वृषाली किन्हाळकर यांचेे ‘मला उमगलेले अध्यात्म’ हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये दर बुधवारी येत असे.

२२ फेब्रुवारी २००९ रोजी करकाळा (तालुका उमरी, जिल्हा नांदेड) येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या त्या खास निमंत्रित पाहुण्या होत्या.


वृषाली किन्हाळकर यांची पुस्तके

  • तारी (कावितासंग्रह)
  • वेदन (कावितासंग्रह)
  • संवेद्य (ललित लेखसंग्रह)
  • सहजरंग (ललित लेखसंग्रह)