"चौल-रेवदंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प... |
(काही फरक नाही)
|
१३:४५, २५ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.
पौराणिक नाव
दोन्ही स्थळांची पौराणिक नावे चंपावती-रेवती! चंपक म्हणजे चाफा, तर अशी चाफ्याची झाडे असलेला भाग तो चंपावती. याला आधार म्हणून आजही गावात जागोजागी असलेली चाफ्याची झाडे दाखवली जातात. काहींच्या मते इथे वापरल्या जाणार्या ‘चंपा’ नावाच्या मासे पकडण्याच्या जाळीवरून किंवा चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले, तर रेवदंड्याचे रेवती हे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या पत्नीच्या नावावरून पडले.