"रवींद्र देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|रवींद्र देसाई(संगीतकार)}} रवींद्र देसाई (१९४७-२०१५) हे सोप्... |
(काही फरक नाही)
|
२३:३०, २३ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
रवींद्र देसाई(संगीतकार) याच्याशी गल्लत करू नका.
रवींद्र देसाई (१९४७-२०१५) हे सोप्या भाषेत संगणकासारख्या विषयांवर पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आणि वक्ते होते. त्यांनीं लेखनातून संगणक, माहिती तंत्रज्ञान, शेअर बाजार असे विविध विषय हाताळले. समृद्ध करणारी आशयपूर्ण मांडणी, वाचकाला सहज समजेल अशी सुलभ भाषा आणि नर्मविनोदाने नटलेली लेखनशैली ही त्यांच्या पुस्तकांची वैशिष्ट्ये होती.
वर्तमानाशी सुसंगत विषय हाताळताना त्यातील गुंतागुंत नीट उलगडत तो विषय सुटसुटीत स्वरूपात वाचकांना समजावून देण्याच्या हातोटीमुळे देसाई यांची पुस्तके वाचकांसाठी मार्गदर्शक ठरली. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांच्या संपादनात रवींद्र देसाई यांचे मोलाचे योगदान होते.