"बाबुराव रामिष्टे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: माथाडी कामगार नेते बाबुराव रामिष्टे (जन्म : इ.स. १९४०; निधन : २६ नोव्... |
(काही फरक नाही)
|
२२:०४, २० डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
माथाडी कामगार नेते बाबुराव रामिष्टे (जन्म : इ.स. १९४०; निधन : २६ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे रहिवासी होते. म्हसकरवाडी, पोस्ट धामणी, तालुका पाटण हे रामिष्टे यांचे जन्मगाव तर काळगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण पाटण येथेच झाले होते. पुढे उदरनिर्वाहासाठी ते मुंबईत आले. तेथे माथाडी कामगार म्हणून काम करत त्यांनी रात्रशाळेत अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते माथाडी कामगारांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जात. त्यांनी माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर चळवळी केल्या. माथाडी कामगारांसाठी घरे आणि अन्य प्रश्नांवर लढा दिला. त्यासाठी त्यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले होते.