Jump to content

"श्रीकांत बहुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीकांत बहुलकर हे एक प्राच्यविद्या संशोधक आहेत. पुण्याच्या भां...
(काही फरक नाही)

१९:१८, २० डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

श्रीकांत बहुलकर हे एक प्राच्यविद्या संशोधक आहेत. पुण्याच्या भांडारकर संस्थेतून ते निवृत्त झाले. पण अजूनही ते तेथे संशोधनाचे काम करत असतात. आचार्य म्हणून त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले.

खेड तालुक्यातील बहुळ हे श्रीकांत बहुलकर यांचे मूळ गाव. या छोट्याशा खेड्यातून पुण्यात आलेल्या डॉ. बहुलकर यांनी अथर्ववेदातील भैषज्य (औषधिशास्त्र) या विषयावर संशोधन केले. डॉक्टरेट पूर्ण केल्यावर शिष्यवृत्ती मिळवून ते जपानला गेले. तेथे त्यांनी तिबेटी भाषा शिकून तिबेटी औषधिशास्त्राचा अभ्यास केला.

यातून पुढे 'अकस्मात वज्रयान' या बौद्ध पंथाचा सखोल अभ्यास झाला आणि त्यात संशोधन करण्याच्या नव्या संधी चालून आल्या. अशा प्रकारे वेद आणि बौद्ध तंत्र विषयातील नावाजलेले तज्ज्ञ म्हणून जागतिक स्तरावर श्रीकांत बहुलकर यांचे नाव ज्ञात आहे.

त्यांना जपान, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड्स, रूमानिया, फिनलंड, रशिया, अमेरिका, थायलंड इत्यादी देशांत विद्यापीठांतून, शैक्षणिक संस्थांमधून व्याख्याने आणि भेटी देण्याकरिता, चर्चासत्रांचे अध्यक्षस्थान भूषविण्याकरिता अनेकदा आमंत्रणे येतात.

श्रीकांत बहुलकर यांनी भूषविलेली पदे

  • पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (तत्कालीन) बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्यपद
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील संस्कृतचे विभागप्रमुख
  • त्या विद्यापीठातील साहित्य व ललितकला विद्याशाखेचे अधिष्ठाता
  • सारनाथ येथे तिबेटच्या अध्ययनाकरिता स्थापलेल्या केंद्रीय विद्यापीठाच्या दुर्मीळ बौद्ध हस्तलिखित संशोधन विभागाचे प्रमुख संपादक
  • हार्वर्ड विद्यापीठाच्या डिव्हिनिटी स्कूलमध्ये मानद प्राध्यापकपद
  • ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रामध्येही अभ्यागत प्राध्यापक

पुरस्कार

  • अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यातील संशोधनाबद्दल दिल्लीच्या साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार