"ए.आर. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ए.आर. जोशी (जन्म : ठाणे, २० डिसेंबर, १९५३) हे मुंबई उच्च न्यायालयात...
(काही फरक नाही)

२२:५५, १२ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

ए.आर. जोशी (जन्म : ठाणे, २० डिसेंबर, १९५३) हे मुंबई उच्च न्यायालयात एक न्यायाधीश होते. दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवून मानवहत्या केल्याच्या सर्व आरोपांतून जोशींनी सलमान खानला मुक्त केले. निवृत्तीपूर्वी जोशींनी दिलेला हा अखेरचा निकाल होता.

ए.आर. जोशी यांनी ठाणे लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. इ.स. १९९३मध्ये ते मुंबईत दिवाणी व सेशन्स कोर्टात न्यायाधीश झाले. २००५मध्ये त्यांनी हायकोर्टात रजिस्ट्रार म्हणून काम केले.

त्यानंतर पुन्हा मुंबई व रत्‍नागिरी दिवाणी-सेशन्स कोर्टात न्यायदान केल्यानंतर १० फेब्रुवारी २००९पासून जोशींवर मुंबई हायकोर्टात न्यायमूर्तीची जबाबदारी सोपवण्यात आली.

आपल्या निवृत्तीपूर्वी निर्णय द्यावा, या उद्देशानेच न्यायमूर्तींनी सलमान प्रकरणाची सुनावणी आग्रहपूर्वक पूर्ण केली. त्यादृ ष्टीने त्यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाला युक्तिवाद करण्यास सांगितले होते.

१९ डिसेंबर २०१५ रोजी ए.आर. जोशी सेवानिवृत्त होतील.