"भांगशीमाता गड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भांगशीमाता किंवा भांगसाई नाव असलेला हा गड औरंगाबादपासून १४ मि.म...
(काही फरक नाही)

१५:३८, ५ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

भांगशीमाता किंवा भांगसाई नाव असलेला हा गड औरंगाबादपासून १४ मि.मी. अंतरावर आहे.

गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण २७०० फूट आहे.. गडनिवासिनी भांगसाई देवीच्या अधिष्ठानाने या गडास भांगसाई गड असे म्हणतात. औरंगाबाद-देवगिरी रस्त्याने जाताना घाटाच्या अलीकडे उजवीकडे एक फाटा आहे, तिथून भांगशीमातागडाकडे जाता येते. गडाच्या उजवीकडच्या टोकावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्याची आहेत. पुढे काही कातळकोरीव पायऱ्या दिसतात आणि खरा गड सुरू होतो. कातळाला मध्यभागी फोडून तयार केलेला जिना पार करत गडावर उजवीकडून प्रवेश होतो. किल्ला म्हणून गडावर फारसे अवशेष नसले तरी, गडमाथ्यावर पाण्याचे जोड टाके आहे. यातील एका टाक्यात मध्यभागी आणखी एक लहान टाके खोदलेले दिसते. तसेच चार टाक्यांचे एक लहानसे संकुलही आहे. साधारण फुटबॉलच्या मैदानासारखा या गडाचा आकार आयताकृती असा आहे. गडावर कडेच्या बाजूने काही गुहा खोदलेल्या दिसतात, त्यांत पाण्याचे स्रोत आहेत. कातळ तासून कोरलेले खांब हे या गुहेरी टाक्यांचे मुख्य आकर्षण आहे. याशिवाय या गडावरून औरंगाबाद टेकड्या व पश्‍चिमेला देवगिरीचा मुलुख यांचे एक सुंदर दर्शन घडते. समोर दिसणाऱ्या डोंगररांगापासून हा गड जरा सुटावलेला दिसतो. त्यामुळे तो ओळखण्यास सोपा पडतो. औरंगाबादवरून पुण्याकडे जाताना MIDC जवळ राज्य महामार्गावरून या गडाचे एक वेगळेच दर्शन घडते.