"डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: बार्टी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स... |
(काही फरक नाही)
|
१७:०४, ३१ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
बार्टी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही पुण्यातली एक शिक्षण संस्था आहे.
या शिक्षणसंस्थेतर्फे इ.स. २०१३ पासून दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य थोर समाजसुधारकांशी निगडीत बाबींवर संशोधन करू इच्छिणार्या अनुसूचित जातींच्या ४०० विद्यार्थ्यांना, एम-फिल/पीएचडी करण्यासाठी फेलोशिप देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे या नॅशनल रिसर्च फेलोशिप आहेत.
२०१६ सालापासूनपासून संत गाडगेबाबा व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावेही फेलोशिप दिल्या जाणार आहेत.
प्रती महिना २५ हजार मानधन
या फेलोशिपसाठी बार्टीतर्फे वेळोवेळी जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येतात. सर्व उमेदवारांची चाचणीद्वारे निवड केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या दोन वर्षांसाठी प्रती महिना २५ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यापुढील तीन वर्षांसाठी २८ हजार रुपये मानधन दिले जाते. त्याबरोबर अन्य भत्तेही दिले जातात. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शक मिळत नसल्याने संशोधनाच्या क्षेत्रात ते मागे पडतात. त्यामुळे बार्टी हा फेलोशिप कार्यक्रम राबविते.