"सतीश जकातदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सतीश जकातदार (जन्म : २७ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे सिनेपत्रकार, आशय फिल्... |
(काही फरक नाही)
|
१३:४८, २८ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
सतीश जकातदार (जन्म : २७ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे सिनेपत्रकार, आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव आणि चित्रपट चळवळीचे संयोजक आहेत. त्यांनी स्वतः सतत नवनवे सिनेमे पाहाणे आणि आशय फिल्म क्लबच्या माध्यमातून समवयस्क मित्रांना वेचून वेगळे "सिनेमे‘ दाखवणे हाच छंद ४०हून अधिक वर्षे जोपासला आहे.
सतीश जकातदार ’मनोहर’ मासिकांत सिनेमावर लेखन करीत. शिवाय ’माणूस‘मध्ये ते कलात्मक चित्रपटांवर गंभीर लेखन करत असत. अमोघ श्रीवास्तव, सलील आदर्श, अशी "टोपणनावे‘ घेऊन ते लिहीत असल्याने, काही उत्तम लेखांमागे "सतीश जकातदार‘ आहेत, याची कुणाला कल्पनाच नसे.
कॉलेजमध्ये असताना सतीश जकातदार यांनीे प्रभाकर वाडेकरांच्या "अर्थ काय या बेंबीचा‘ नाटकात अभिनय केेला होता.
संस्था स्थापना
सतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्नकुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट, इ.स. १९८५ रोजी आशय फिल्म क्लबची स्थापना केली. जकातदार या संस्थेचे संचालक आहेत.
दिग्दर्शन
सतीश जकातदार यांनी चित्रपट संग्रहालयाच्या वाटचालीवर आधारलेल्या ‘प्रिझव्र्हेशन ऑफ मूव्हिंग इमेजेस’ या लघुपटाचेे दिग्दर्शन केले आहे. लघुपटाची निर्मिती वंदना भाले यांची आहे. सतीश जकातदार यांनी वंदना भाले यांच्या साथीने "मल्लिकार्जुन मन्सूर‘ यांच्यावर एक लघुपट बनवला होता; "टुवर्डस बेटर टुमारो‘ हा अनुबोधपटही काढला होता.
व्याख्याने
जकातदारांनी ’मराठी चित्रपटांचा इतिहास‘ या विषयावर महाराष्ट्र राज्यभर दृकश्राव्य व्याख्यानेे दिली आहेत.
लेखन
साहित्य, नाट्य, चित्रपट यांत भरभरून रस घेणरे, ’आशय फिल्म क्लब‘चा संचालक या नात्याने निवडक चित्रपट रसिकांपर्यंत पोचवणारे, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये "प्रोग्रॅम डायरेक्टर‘ची भूमिका बजावणारे, नवनव्या फिल्मविषयक चर्चांना तोंड फोडणारे सतीश जकातदार यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.
’मायबोली‘ या संकेतस्थळावर सतीश यांनी प्रभातचे संगीतकार, राजकमलचे संगीतकार, आनंदघन, वसंत पवार, पु.ल. देशपांडे यांच्यावरच्या मालिकांचे लेखन - संपादन केले होते. सतीशच्या संकल्पनेनुसार "माणूस ते लिमिटेड माणुसकी‘ हा मराठी चित्रपट गीतांचा इतिहास मांडणारा दृक्श्राव्य कार्यक्रम सुधीर गाडगीळ यांचा गट सादर करत असे. त्यासाठी ते सतत दोन वर्षे चाळीसगावलाही जात होते,
सतीश जकातदार यांनी संपादन केलेली/लिहिलेली पुस्तके
- फ्लॅशबॅक : चंदेरी दुनियेत (१९६१ ते ८६ या काळात 'माणूस'मध्ये प्रसद्ध झालेल्या काही निवडक लेखांचा संपादित संग्रह; सहसंपादिका वंदना भाले)
- हकिकत सिनेमाची (प्रकाशन - २७ ऑक्टोबर, २०१५)