"योगेश जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. योगेश मोरेश्वर जोशी हे एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. योगेश जोशी य... |
(काही फरक नाही)
|
१७:२१, ३० सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
डॉ. योगेश मोरेश्वर जोशी हे एक मराठी शास्त्रज्ञ आहेत.
योगेश जोशी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये झाले. मॉडर्न कॉलेजमधून बारावी झाल्यानंतर त्यांनी एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधून (एनसीएल) डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. आशिष लेले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्डीचे संशोधन केले. त्यानंतर तीन वर्षे अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिपअंतर्गत संशोधन केल्यावर ते भारतात परतले. त्यानंतर २००४ मध्ये ते आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
२०१५ सालच्या डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराचे ते मानकरी होत.