योगेश जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. योगेश मोरेश्वर जोशी (१९७४) हे एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. योगेश जोशी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये झाले. मॉडर्न कॉलेजमधून बारावी झाल्यानंतर त्यांनी एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधून (एनसीएल) डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. आशिष लेले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्‌डीचे संशोधन केले. त्यानंतर तीन वर्षे अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिपअंतर्गत संशोधन केल्यावर ते भारतात परतले. त्यानंतर २००४ मध्ये ते आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २०१५ सालापासून पुढील ३ वर्षांसाठी ते तेथे सी.व्ही. शेषाद्री विद्यासनाचे प्राध्यापकही असतील.

यापूर्वी ते मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधे) पाहुणे प्राध्यापक होते. (२०१४-१५)

२०१५ सालच्या डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराचे ते मानकरी होत.

योगेश जोशी यांनी मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • अणुऊर्जा खात्याचा तरुण संशोधक पुरस्कार (२००६)
  • अणुऊर्जा खात्याच्या विज्ञान संशोधन समिती(DAE-SRC)तर्फे सर्वोत्कृष्ट तपासकार्यासाठीचा पुरस्कार (२०१२)
  • अमर डाय केमिकल पुरस्कार (२००९)
  • कानपूर आयआयटीचा सी.एन.आर.फॅकल्टी पुरस्कार (२०१५)
  • पी.के. केळकर फेलोशिप (२००९)
  • भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी प्रबोधिनी(INAE)चा तरुण इंजिनिअर पुरस्कार (२००८)
  • शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (२०१५)