Jump to content

"गौतम बंबावाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गौतम हेमंत बंबावाले (जन्म : पुणे, १९५८) हे एक मराठी प्रशासकीय अधिका...
(काही फरक नाही)

२३:१८, २८ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

गौतम हेमंत बंबावाले (जन्म : पुणे, १९५८) हे एक मराठी प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांचे आई वडील ुष-हेमंत बंबावाले पुण्यात राहतात.

शिक्षण

गौतम बंबावाले यांचे शिक्षण पुण्यातील बिशप हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट येथे झाले. १९८४मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेसाठी (आयएफएस) त्यांची निवड झाली.

महाविद्यालयीन जीवनात गौतम यांना खेळात खूप रस होता. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या क्रिकेटच्या संघाचे ते कर्णधार होते.

कारकीर्द

सुरुवातीला त्यांचे पोस्टिंग दिल्लीत पूर्वेकडील विभागाचे सहसचिव या पदावर होते. तेथून बदलून ते भूतानला राजदून म्हणून गेले.

चीनविषयक बाबींचे तज्ज्ञ

गौतम बंबावाले हे सिनॉलॉजिसट आहेत. त्यांना चिनी भाषा येत असल्याने चीनबरोबरच्या वाटाघाटीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. २०१३मध्ये जेव्हा चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली, तेव्हा परराष्ट्र खात्याच्या स्तरावर झालेल्या चर्चांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

पाकिस्तानातील उच्चायुक्तपद

भूतानला राजदूत असलेल्या गौतम बंबावाले यांची पाकिस्तानात उच्चायुक्तपदावर नियुक्ती झाली आहे. पाकिस्तानमधील उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन निवृत्त झाल्यानंतर डिसेंबरमध्ये बंबावाले उच्चायुक्त म्हणून इस्लामाबादला जातील.