गौतम बंबावाले
भारतीय प्रशासकीय अधिकारी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २, इ.स. १९५८, इ.स. १९५८ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
गौतम हेमंत बंबावाले (जन्म : पुणे, इ.स. १९५८) हे एक भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत.
कौटुंबिक माहिती आणि शिक्षण
[संपादन]गौतम बंबावाले यांचे शिक्षण पुण्यातील बिशप हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज आणि गोखले इन्स्टिट्यूट येथे झाले. १९८४मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेसाठी (आयएफएस) त्यांची निवड झाली.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या क्रिकेटच्या संघाचे ते कर्णधार होते.
त्यांचे वडील हेमंत बंबावाले व आई पुण्यात राहतात.
कारकीर्द
[संपादन]त्यांचे पहिले पोस्टिंग दिल्लीत पूर्वेकडील विभागाचे सहसचिव या पदावर होते. तेथून बदलून ते भूतानला राजदूत म्हणून गेले.
चीनविषयक बाबींचे तज्ज्ञ
[संपादन]गौतम बंबावाले हे सिनॉलॉजिस्ट आहेत. त्यांना चिनी भाषा येत असल्याने चीनबरोबरच्या वाटाघाटीत त्यांचा मोठा सहभाग होता. २०१३मध्ये जेव्हा चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली, तेव्हा परराष्ट्र खात्याच्या स्तरावर झालेल्या चर्चांमध्ये त्यांनी भाग घेतला.
पाकिस्तानातील उच्चायुक्तपद
[संपादन]भूतानला राजदूत असलेल्या गौतम बंबावाले यांची पाकिस्तानात उच्चायुक्तपदावर नियुक्ती झाली आहे. आधीचे उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन निवृत्त झाल्यानंतर डिसेंबर २०१५अंती बंबावाले यांनी पाकिस्तानमधील इस्लामाबादला जाऊन भारताचे उच्चायुक्त म्हणून पदभार स्वीकारला.