"अशोक पाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अशोक पाध्ये (जन्म : इ.स. १९३८, मृत्यू : सप्टेंबर, २०१५) हे एक मराठी विज... |
(काही फरक नाही)
|
१४:१०, २८ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
अशोक पाध्ये (जन्म : इ.स. १९३८, मृत्यू : सप्टेंबर, २०१५) हे एक मराठी विज्ञानलेखक होते. विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना, नवे संशोधन, नवीन प्रवाह यांबाबत अतिशय सुलभ भाषेत लेखन करून त्यांनी मराठीतील विज्ञान लेखनाची परंपरा निष्ठेने पुढे नेली.
अशोक पाध्ये यांनी पदवी भूशास्त्रात असली तरी त्यांनी विविध औद्योगिक संस्थांतील जबाबदारीच्या पदांवर राहून करिअर केले. ते विज्ञान पत्रकार, लेखक, अनुवादक तर होतेच; परंतु त्याचबरोबर ग्लायडर वैमानिकही होते. काचतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. विमानविद्येचे, सिनेमॅटोग्राफीचे ते जाणकार होते. रशियन भाषाही त्यांना अवगत होती. अनेक खासगी महाविद्यालयांत त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
पुणे विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान वाटिकेच्या (सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी पार्कच्या) उभारणीत अशोक पाध्ये यांचा मोठा वाटा होता. त्या वाटिकेचे ते संचालक होते.
अशोक पाध्ये यांचे लेखन
विविध वृत्तपत्रे आणि मासिकांतून त्यांचे विज्ञान विषयावरील संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. 'डीएनएचे गोल गोल जिने' हे त्यांचे पुस्तक डीएनएची संकल्पना आणि त्याचे विज्ञान साध्या भाषेत उलगडणारे आहे. महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला.
अनुवादित पुस्तके
इंग्रजीतील उत्तमोत्तम साहित्याचा सरस अनुवाद अशोक पाध्ये यांनी केला. जॉर्ज ऑरवेल यांच्यापासून ते डॅन ब्राऊन यांच्यापर्यंतच्या अनेक लेखकांच्या इंग्रजी साहित्याचा त्यांनी अनुवाद केला.
एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे भाषांतरही त्यांनी केले. टाटा कंपनीतील अधिकारी आर. एन. लाला यांच्या तसेच माजी संरक्षणमंत्री जसवंतसिंह यांनी लिहिलेल्या जिना - हिंदुस्थान फाळणी आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरणी लिहिलेल्या ग्रंथांचा अनुवाद आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या पहिल्या धाडसी अंटार्टिका मोहिमेचा त्यांनी लिहिलेला वृत्तान्त वाचनीय होते.