"मोहम्मद जावद झरीफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: महंमद जावद झरीफ (जन्म : [[तेहरान, ७ जानेवारी, इ.स. १९६०) हे इराणचे पर... |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
त्यानंतर महंमद झरीफ यांनी डेन्व्हर विद्यापीठाअंतर्गत येणार्या जेसेफ कोरबेल स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या केंद्रातून आंतरराष्ट्रीय कायदा व धोरण या विषयात पीएच.डी. केले. |
त्यानंतर महंमद झरीफ यांनी डेन्व्हर विद्यापीठाअंतर्गत येणार्या जेसेफ कोरबेल स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या केंद्रातून आंतरराष्ट्रीय कायदा व धोरण या विषयात पीएच.डी. केले. |
||
राजकीय आणि |
==राजकीय आणि अध्यापकीय कारकीर्द== |
||
महंमद जावद झरीफ यांनी इ.स. १९९० नंतर राजनैतिक पातळीवर अनेक पदे भूषवली. ते तेहरान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यागत प्राध्यापक आहेत. संयुक्त राष्ट्रातही झरीफ यांनी इराणी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. नंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या नि:शस्त्रीकरण आयोगाचे अध्यक्ष झाले. ‘इराणिनियन जर्नल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ व ‘इराणियन फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकांचे संपादक होते. २००२ ते २००७ ते संयुक्त राष्ट्रात प्रतिनिधी होते. २०१३ मध्ये ते इराणचे परराष्ट्रमंत्री झाले. त्यापूर्वी ते काही काळ अमेरिकेत इराणचे राजदूत होते. |
|||
==अण्वस्त्र नियंत्रण समझोता== |
|||
हा समझोता करताना त्यांनी ‘स्माइल डिप्लोमसी व झीरो टेन्शन डिप्लोमसी’ वापरली. झरीफ यांना हा करार करणे शक्य होण्याचे कारण म्हणजे त्यांना अमेरिकी संस्कृती माहिती होती व त्यांचे अमेरिकी नेत्यांशी थेट संबंध होते. |
|||
राजनीतिज्ञाचे मर्म सांगताना झरीफ यांनी म्हटले आहे, की जो वातावरणातील अस्वस्थता आपल्या हास्याआड दडवून वाटाघाटी करू शकतो, तो खरा राजनीतिज्ञ. त्यांच्या या व्याख्येस ते जागले. |
|||
[[वर्ग:इराण]] |
००:०६, १५ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
महंमद जावद झरीफ (जन्म : [[तेहरान, ७ जानेवारी, इ.स. १९६०) हे इराणचे परराष्ट्रमंत्री आहेत. नुकताच त्यांनी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये अशक्यप्राय वाटणारा अण्वस्त्र नियंत्रण समझोता घड्वून आणला.
शिक्षण
महंमद जावद झरीफ यांचे शालेय शिक्षण अलावी स्कूल येथे झाले, ती धार्मिक संस्था होती. त्यांनी लहानपणीच अलि शारियती व समाद बेहरंगी यांची पुस्तके वाचून क्रांतिकारी विचार आत्मसात केले होते. ते कट्टर धर्मनिष्ठ आहेत. ते अस्खलित इंग्रजी बोलतात.
झरीफ हे सतराव्या वर्षी अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांनी सॅनफ्रान्सिस्को येथील ड्र्यूू कॉलेज प्रिपरेटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे सॅनफ्रान्सिस्को स्टेट विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात बी.ए. केले व नंतर १९८२ मध्ये ते एम.ए. झाले.
त्यानंतर महंमद झरीफ यांनी डेन्व्हर विद्यापीठाअंतर्गत येणार्या जेसेफ कोरबेल स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या केंद्रातून आंतरराष्ट्रीय कायदा व धोरण या विषयात पीएच.डी. केले.
राजकीय आणि अध्यापकीय कारकीर्द
महंमद जावद झरीफ यांनी इ.स. १९९० नंतर राजनैतिक पातळीवर अनेक पदे भूषवली. ते तेहरान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यागत प्राध्यापक आहेत. संयुक्त राष्ट्रातही झरीफ यांनी इराणी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. नंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या नि:शस्त्रीकरण आयोगाचे अध्यक्ष झाले. ‘इराणिनियन जर्नल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ व ‘इराणियन फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकांचे संपादक होते. २००२ ते २००७ ते संयुक्त राष्ट्रात प्रतिनिधी होते. २०१३ मध्ये ते इराणचे परराष्ट्रमंत्री झाले. त्यापूर्वी ते काही काळ अमेरिकेत इराणचे राजदूत होते.
अण्वस्त्र नियंत्रण समझोता
हा समझोता करताना त्यांनी ‘स्माइल डिप्लोमसी व झीरो टेन्शन डिप्लोमसी’ वापरली. झरीफ यांना हा करार करणे शक्य होण्याचे कारण म्हणजे त्यांना अमेरिकी संस्कृती माहिती होती व त्यांचे अमेरिकी नेत्यांशी थेट संबंध होते.
राजनीतिज्ञाचे मर्म सांगताना झरीफ यांनी म्हटले आहे, की जो वातावरणातील अस्वस्थता आपल्या हास्याआड दडवून वाटाघाटी करू शकतो, तो खरा राजनीतिज्ञ. त्यांच्या या व्याख्येस ते जागले.