Jump to content

"दंडोबाचा डोंगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दंडोबाचा डोंगर हा सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याच...
(काही फरक नाही)

१३:३१, १३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

दंडोबाचा डोंगर हा सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावाजवळचा एक डोंगर आहे. डोंगरावर पुरातन दंडनाथाचे देऊळ आहे. डोंगरात सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रे आता कालौघात पुसट झाली आहेत.

डोंगरावर एक पाच मजली मनोरा आहे. मनोर्‍याचा सर्वांत वरचा भाग आहे तेथे चार ते पाच माणसे उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायर्‍या आहेत, पण तिथून पुढे वरती जायला मानवनिर्मित पायर्‍या नाहीत; सध्या तेथे एक दगड आहे; त्याचा उपयोग करून वरती जाता येते. चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायर्‍या आहेत. एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगले असेल तर मनोर्‍यावर उभे राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचे शिखर दिसते.

पुण्यातून दंडोबाच्या डोंगराकडे जाण्याचा रस्ता

पुणे-सांगली-मिरज-कवठे महांकाळ-खरशिंगफाटा-दंडोबाचा डोंगर. (एकूण अंतर : सुमारे २७५ किमी)