Jump to content

"रा.भा. पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
रा. भा. पाटणकर हे मराठीतील ख्यातनाम लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ते मराठी साहित्यिक [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]] यांचे नातू आहेत.<ref>अर्पणपत्रिका, सौंदर्यमीमांसा, रा. भा. पाटणकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयनगर, पुणे ३०, दुसरी आवृत्ती १९८१</ref> त्यांचे सौंदर्यमीमांसा हे जुने पुस्तक आणि अपूर्ण क्रांती हे १९९९ चे पुस्तक गाजलेले लेखन मानले जाते.
राजाराम भालचंद्र पाटणकर (जन्म : खामगाव, ९ जानेवारी १९२७; मृत्यू : २४ मे, २००४) हे मराठीतील ख्यातनाम लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ते मराठी साहित्यिक [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]] यांचे नातू आहेत.<ref>अर्पणपत्रिका, सौंदर्यमीमांसा, रा. भा. पाटणकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयनगर, पुणे ३०, दुसरी आवृत्ती १९८१</ref> त्यांचे सौंदर्यमीमांसा हे जुने पुस्तक आणि अपूर्ण क्रांती हे १९९९ चे पुस्तक गाजलेले लेखन मानले जाते.

==लहानपण==
==लहानपण==
रा.भा. पाटणकरांचे वडील भा. ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.

==शिक्षण==
==शिक्षण==
रा.भा. पाटणकर यांचे प्राथमिक शिक्षण रूंगठा हायस्कूलमध्ये व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे बी.ए.(इंग्रजी) व एम.ए.(इंग्रजी)चे शिक्षण नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात झाले.
* बी.ए. : इंग्लिश
* एम.ए : इंग्लिश

==कारकीर्द==
==अध्यापकीय कारकीर्द==
एम.ए. झाल्यानंतर पाटणकर यांनी भावनगर अहमदाबाद, भुज आणि अमरावती येथील महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले.. १९६० मधील कम्युनिकेशन इन लिटरेचर या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी संपादन केली. १९६४ साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. निवृत्तीपर्यंत ते तेथे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख होते.

==लेखन==
पाटणकरांनी बरेच लेखन केले. त्यांचा ’पुन्हा एकदा एकच प्याला’ हा पहिला लेख नवभारत टाइम्समध्ये १९५१ साली प्रकाशित झाला. त्यानंतर एरिअल या टोपण नावाने ते कथा कविता लिहीत असत. परंतु पाटणकरांचा व्यासंगाचा विषय सौंदर्यशास्त्र हा होता. सौंदर्य मीमांसा, क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य, कांटची सौंदर्यमीमांसा हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इ. तत्त्ववेत्यांनी स्वीकारलेले सिद्धान्त पाटणकरांनी या ग्रंथांतून स्पष्ट केले आहेत. कमल देसाई, मुक्तिबोध, शांताराम या तीनही लेखकांच्या लेखांवर पाटणकरांनी समीक्षाग्रंथ लिहिले आहेत.

पाटणकरांच्या पुस्तकांत त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना त्यांची मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट करणार्‍या आहेत.

==रा.भा. पाटणकर यांनी लिहिलेली पुस्तके==
==रा.भा. पाटणकर यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ १३: ओळ १९:
* कथाकार शांताराम
* कथाकार शांताराम
* कमल देसाई यांचे कथाविश्व
* कमल देसाई यांचे कथाविश्व
* कांटची सौंदर्यमीमांसा
* कॉलिंगवूडची कलामीमांसा - एक भाष्य
* कॉलिंगवूडची कलामीमांसा - एक भाष्य
* क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य
* मुक्तिबोधांचे साहित्य
* मुक्तिबोधांचे साहित्य
* वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि ध्रुवीकरण
* वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि ध्रुवीकरण

२३:४३, १२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

राजाराम भालचंद्र पाटणकर (जन्म : खामगाव, ९ जानेवारी १९२७; मृत्यू : २४ मे, २००४) हे मराठीतील ख्यातनाम लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ते मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे नातू आहेत.[] त्यांचे सौंदर्यमीमांसा हे जुने पुस्तक आणि अपूर्ण क्रांती हे १९९९ चे पुस्तक गाजलेले लेखन मानले जाते.

लहानपण

रा.भा. पाटणकरांचे वडील भा. ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.

शिक्षण

रा.भा. पाटणकर यांचे प्राथमिक शिक्षण रूंगठा हायस्कूलमध्ये व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे बी.ए.(इंग्रजी) व एम.ए.(इंग्रजी)चे शिक्षण नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात झाले.

अध्यापकीय कारकीर्द

एम.ए. झाल्यानंतर पाटणकर यांनी भावनगर अहमदाबाद, भुज आणि अमरावती येथील महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले.. १९६० मधील कम्युनिकेशन इन लिटरेचर या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी संपादन केली. १९६४ साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. निवृत्तीपर्यंत ते तेथे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख होते.

लेखन

पाटणकरांनी बरेच लेखन केले. त्यांचा ’पुन्हा एकदा एकच प्याला’ हा पहिला लेख नवभारत टाइम्समध्ये १९५१ साली प्रकाशित झाला. त्यानंतर एरिअल या टोपण नावाने ते कथा कविता लिहीत असत. परंतु पाटणकरांचा व्यासंगाचा विषय सौंदर्यशास्त्र हा होता. सौंदर्य मीमांसा, क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य, कांटची सौंदर्यमीमांसा हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इ. तत्त्ववेत्यांनी स्वीकारलेले सिद्धान्त पाटणकरांनी या ग्रंथांतून स्पष्ट केले आहेत. कमल देसाई, मुक्तिबोध, शांताराम या तीनही लेखकांच्या लेखांवर पाटणकरांनी समीक्षाग्रंथ लिहिले आहेत.

पाटणकरांच्या पुस्तकांत त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना त्यांची मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट करणार्‍या आहेत.

रा.भा. पाटणकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अपूर्ण क्रांती
  • कथाकार शांताराम
  • कमल देसाई यांचे कथाविश्व
  • कांटची सौंदर्यमीमांसा
  • कॉलिंगवूडची कलामीमांसा - एक भाष्य
  • क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य
  • मुक्तिबोधांचे साहित्य
  • वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि ध्रुवीकरण
  • साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र
  • सौंदर्यमीमांसा
  • Indo - British Encounter (इंग्रजी)

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ अर्पणपत्रिका, सौंदर्यमीमांसा, रा. भा. पाटणकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयनगर, पुणे ३०, दुसरी आवृत्ती १९८१
  2. ^ पुरस्कारप्राप्त साहित्यिक. मराठी भाषा विभाग - महाराष्ट्र शासन. १२ सप्टेंबर २०१५ रोजी पाहिले.