"आदेश श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
२००५ साली आदेश श्रीवास्तव दूरचित्रवाणीवरील ’सा रे गा मा पा - २००५’ या गायनस्पर्धेचे परीक्षक होते. पुढच्याच वर्षी त्यांना बालवेश्या व्यवसायावरील ’सना’ नावाचा छोटा चित्रपट दिग्दर्शित केला. |
२००५ साली आदेश श्रीवास्तव दूरचित्रवाणीवरील ’सा रे गा मा पा - २००५’ या गायनस्पर्धेचे परीक्षक होते. पुढच्याच वर्षी त्यांना बालवेश्या व्यवसायावरील ’सना’ नावाचा छोटा चित्रपट दिग्दर्शित केला. |
||
अकॉन, ज्युलिया फोरदॅम आणि वायसिफ जीन या परदेशी गायकांबरोबर आदेशने काही गाणी गायली. हिटलॅब डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळावर आदेश श्रीवास्तव यांनी अकॉनला बरोबर घेऊन, भारतस्तरीय कलाकार-शोधाचे कार्यक्रम केले. गाण्याचे तज्ञांकडून विश्लेषण करून, कोणत्या गायकाचे कोणते गाणे गाजेल याचा आगामी अंदाज या कार्यक्रमात केला जात असे. |
अकॉन, ज्युलिया फोरदॅम, डॉमिनिक मिलर, टी-पेन, शाकिरा आणि वायसिफ जीन या परदेशी गायकांबरोबर आदेशने काही गाणी गायली. हिटलॅब डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळावर आदेश श्रीवास्तव यांनी अकॉनला बरोबर घेऊन, भारतस्तरीय कलाकार-शोधाचे कार्यक्रम केले. गाण्याचे तज्ञांकडून विश्लेषण करून, कोणत्या गायकाचे कोणते गाणे गाजेल याचा आगामी अंदाज या कार्यक्रमात केला जात असे. |
||
इ.स. २००० नंतर हिंदी चित्रपटांचे संगीतच बदलले. मेलडी संपून 'बीट्स'चा दंगा सुरू झाला. टीव्हीवरही रिअॅलिटी शोंचे प्रस्थ वाढत गेले या स्थित्यंतराच्या काळात आदेश श्रीवास्तव नाव मागे पडत गेले. |
|||
आदेश श्रीवास्तव यांच्या पत्नीचे नाव विजयंता. संगीत दिग्दर्शक [[जतीन-ललित]] हे त्यांचे मेव्हणे होत. |
|||
==कौटुंबिक माहिती== |
|||
आदेश श्रीवास्तव यांच्या पत्नीचे नाव विजयंता पंडित संगीत दिग्दर्शक [[जतीन-ललित]] हे तिचे भाऊ आणि अभिनेत्री [[सुलक्षणा पंडित]] ही बहीण. आदेशच्या चित्रेश श्रीवास्तव या मोठ्या भावाची आयलाइन टेलिफिल्म नावाची कंपनी राहत फतेह अली खानच्या काळ्या पैशाच्या प्रकरणात बदनाम झाली होते. |
|||
==आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट== |
==आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट== |
१७:११, १२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
आदेश श्रीवास्तव (जन्म : जबलपूर, ४ सप्टेंबर, इ.स. १९६६; मृत्यू : मुंबई, ५ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. कन्यादान हा त्यांचा पहिला चित्रपट, पण तो प्रकाशित होऊ शकला नाही. ’आओ प्यार करें’ या चित्रपटाद्वारे आदेश श्रीवास्तव यांचे मुंबईच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.
२००५ साली आदेश श्रीवास्तव दूरचित्रवाणीवरील ’सा रे गा मा पा - २००५’ या गायनस्पर्धेचे परीक्षक होते. पुढच्याच वर्षी त्यांना बालवेश्या व्यवसायावरील ’सना’ नावाचा छोटा चित्रपट दिग्दर्शित केला.
अकॉन, ज्युलिया फोरदॅम, डॉमिनिक मिलर, टी-पेन, शाकिरा आणि वायसिफ जीन या परदेशी गायकांबरोबर आदेशने काही गाणी गायली. हिटलॅब डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळावर आदेश श्रीवास्तव यांनी अकॉनला बरोबर घेऊन, भारतस्तरीय कलाकार-शोधाचे कार्यक्रम केले. गाण्याचे तज्ञांकडून विश्लेषण करून, कोणत्या गायकाचे कोणते गाणे गाजेल याचा आगामी अंदाज या कार्यक्रमात केला जात असे.
इ.स. २००० नंतर हिंदी चित्रपटांचे संगीतच बदलले. मेलडी संपून 'बीट्स'चा दंगा सुरू झाला. टीव्हीवरही रिअॅलिटी शोंचे प्रस्थ वाढत गेले या स्थित्यंतराच्या काळात आदेश श्रीवास्तव नाव मागे पडत गेले.
कौटुंबिक माहिती
आदेश श्रीवास्तव यांच्या पत्नीचे नाव विजयंता पंडित संगीत दिग्दर्शक जतीन-ललित हे तिचे भाऊ आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित ही बहीण. आदेशच्या चित्रेश श्रीवास्तव या मोठ्या भावाची आयलाइन टेलिफिल्म नावाची कंपनी राहत फतेह अली खानच्या काळ्या पैशाच्या प्रकरणात बदनाम झाली होते.
आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट
- अंगारे (सहसंगीतकार अन्नू मलिक)
- उल्झन
- आओ प्यार करें
- कन्यादान (अप्रकाशित, १९९३)
- कुँवारा (२०००)
- कभी खुशी कभी गम
- चलते चलते (सह संगीतकार जतीन-ललित)
- चिनगारी
- तरकीब (२००१)
- दहक
- दीवार (नवीन) (अन्य संगीतकारांसह)
- देव (अन्य संगीतकारांसह)
- बडे दिलवाला
- बस इतना सा ख्वाब है
- बागबान
- बाबुल (नवीन) (अन्य संगीतकारांसह)
- मेजरसाब
- लाल बादशाह
- वेलकम बॅक
- शस्त्र (१९९६)
- शिकारी (२००१)
- सलमा पे दिल आ गया
आदेश श्रीवास्तव यांनी गायलेली काही प्रसिद्ध गाणी
- किसका चेहरा (चित्रपट - तरकीब)
- क्या अदा है क्याजलवे है तरे पारो (चित्रपट - शस्त्र, १९९६)
- गुस्ताखियाँ
- मोरा पिया (चित्रपट राजनीती)
- ये हवाएँ (चित्रपट - बस इतना सा ख्वाब है)
- शावा शावा
आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेली काही गाणी
- ओ सजना दिलवर (गायक-गायिका उदित नारायण-लता, चित्रपट - कन्यादान)
- गुमशुदा (चित्रपट - चलते चलते)
- जाने तमन्ना (चित्रपट - कन्यादान)
- पहेली नजर में तूने ये क्या किया (गायक-गायिका उदित नारायण-लता, चित्रपट - अंगारे)
- सुनो ना, सुनो ना (चित्रपट - चलते चलते)
- सोना सोना (गायक - सुदेश भोसले; चित्रपट - मेजरसाब)
- हाथों में आ गया जो कोई (चित्रपट - आओ प्यार करें)
(अपूर्ण)