Jump to content

"आनंदीबाई भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशव्यांची पत्‍नी आनंदीबाई यांचे मा...
(काही फरक नाही)

२०:१५, १० सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशव्यांची पत्‍नी आनंदीबाई यांचे माहेरचे आडनाव ओक.

’शंभर राजकारणे करतील’ असा आनंदीबाईंचा लौकिक होता. ’ध चा मा’ करणारी स्त्री म्हणून महाराष्ट्र आनंदीबाईंना ओळखतो. आनंदीबाई कोपरगावला बंदिस्त असताना त्यांनी दिनचर्या लिहून ठेवली आहे, तीवरून आनंदीबाईंच्या स्वभावाचे यथार्थ दर्शन घडण्यास मदत होते. त्यांच्या दिनचर्येवरून त्यांच्या अंतःकरणाची ऋजुता आणि मनाचा कणखरपणा दिसून येतो. नाना फडणविसांनी लादलेल्या जाचास कंटाळून लिहिलेल्या पत्रांत त्या आपला राग व्यक्त करताना रामायण-महाभारतातील दृष्टांत व दाखले देतात, यावरून त्यांचा वाचनाचा व्यासंग चांगला असल्याचे कळते. वाचनात जशा त्या प्रवीण होत्या तशा लिहिण्यातही हुशार होत्या हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांवरून समजते. महत्त्वाची पत्रे त्या स्वतः लिहीत असत.

नाना फडणविसांना पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी नानांची कान‍उघाडणी केली आहे. बारभाईंचा कारभार बाईंना पसंत नव्हता. सखारामबापूंना यासंबंधी लिहिलेल्या एका पत्रात उपरोध आणि त्वेष भरला आहे. या पत्रात सखारामबापूंनी वृद्धापकाळी केलेल्या लग्नाबद्दल त्यांना टोमणा मारला आहे.

आपले पुत्र दुसरे बाजीराव यांचा आचरटपणा आनंदीबाईंना पसंत नव्हता. त्यांनी लिहिले आहे, ’बाजीराव थोर झाले असता अद्याप मर्यादेची तर्‍हा नाही’.