"यशवंत कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:

भाषा संचालनालय सुरू झाल्यानंतर राजभाषा मराठीविषयक धोरण राबविणे, परिभाषा कोश, अमराठी कर्मचार्‍यांसाठी मराठी भाषा परीक्षा आयोजित करणे, केंद्र राज्य अधिनियमांचा अनुवाद करणे अशी काहीशी क्लिष्ट कामे यशवंत कानिटकर करीत. नंतर ते भाषा संचालक झाले आणि या पदावर दीर्घ काळ काम करून सेवानिवृत्त झाले.

==यशवंत कानिटकर यांची साहित्यसेवा आणि प्रकाशित पुस्तके==
* 'लोकमान्य टिळक' या अष्टखंडात्मक ग्रंथाच्या आठव्या खंडाचे संपादन त्यांनी केले.
* साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत मराठी शब्दकोशाचे ते मुख्य संपादक होते.
-----
* आज इथे तर उद्या तिथे (मराठवाड्यातील अनुभवावरील ललित लेखन - पुस्तक)
* ते दिवस ती माणसे (पुस्तक)
* पश्चिमवारे (पुस्तक)
* 'मराठी भाषा : स्वरूप आणि उपयोजन (पुस्तक)
* मेनका (कवितासंग्रह)
* लोकमान्य टिळकांचा भाषाविचार (पुस्तक)

००:२८, २ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

यशवंत कानिटकर (जन्म : लिंबागणेश-मराठवाडा, १२ डिसेंबर १९२१; मृत्यू : मुंबई, २२ जुलै, २०१५) हे एक मराठी भाषातज्ञ असून मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक होते.

भाषा संचालक या नात्याने भाषाविषयक प्रश्नावर राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना आदी स्वरूपाचे तसेच 'व्यक्तिचित्रे'विषयकही विपुल लेखन केले होते.

शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी कानिटकर हैदराबादला गेले. उस्मानिया विद्यापीठातून प्रावीण्यासह त्यांनी मराठी विषयात एम.ए. केले. ग्रंथावर विलक्षण प्रेम असल्याने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील उत्तमोत्तम व दर्जेदार पुस्तकांचे त्यांचे वाचन सुरू होते. दुसरीकडे काव्यलेखनही चालू होते. मराठी तरुणांसाठी 'प्रतिष्ठान' हे मासिक तेव्हा हक्काचे व्यासपीठ होते. तेथे यशवंत कानिटकरांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या.

मासिकाचे संपादन आणि काव्यलेखन

१९५३ ते १९५७ या काळात ’प्रतिष्ठान'च्या संपादकपदाची जबाबदारी पेलत असतानाकानिटकरांचा 'मेनका' हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.

रॉयवादी कानिटकर

हैदराबाद येथेच एम. एन. रॉय यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांच्या विचारांनी यशवंत कानिटकर प्रभावित झाले व नंतर रॉयवादी बनले.

भाषाविषयक कार्य

चार भाषांवर प्रभुत्व असल्याने हैदराबाद राज्याच्या भाषा विभागात ते भाषांतरकार म्हणून रुजू झाले.

मुंबईत बदली

१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर त्यांची बदली तत्कालीन 'मुंबई राज्या'त झाली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शासनाने सरकारी कारभाराची भाषा मराठी राहील, असे धोरण जाहीर केले. त्यासाठी प्रारंभी प्रशासनिक परिभाषा कोश व मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्याच्या कामी यशवंत कानिटकर यांचे बहुमोल योगदान होते.

भाषा संचालनालय सुरू झाल्यानंतर राजभाषा मराठीविषयक धोरण राबविणे, परिभाषा कोश, अमराठी कर्मचार्‍यांसाठी मराठी भाषा परीक्षा आयोजित करणे, केंद्र राज्य अधिनियमांचा अनुवाद करणे अशी काहीशी क्लिष्ट कामे यशवंत कानिटकर करीत. नंतर ते भाषा संचालक झाले आणि या पदावर दीर्घ काळ काम करून सेवानिवृत्त झाले.

यशवंत कानिटकर यांची साहित्यसेवा आणि प्रकाशित पुस्तके

  • 'लोकमान्य टिळक' या अष्टखंडात्मक ग्रंथाच्या आठव्या खंडाचे संपादन त्यांनी केले.
  • साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत मराठी शब्दकोशाचे ते मुख्य संपादक होते.

  • आज इथे तर उद्या तिथे (मराठवाड्यातील अनुभवावरील ललित लेखन - पुस्तक)
  • ते दिवस ती माणसे (पुस्तक)
  • पश्चिमवारे (पुस्तक)
  • 'मराठी भाषा : स्वरूप आणि उपयोजन (पुस्तक)
  • मेनका (कवितासंग्रह)
  • लोकमान्य टिळकांचा भाषाविचार (पुस्तक)