"प्राज्ञपाठशाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: वाईची प्राज्ञपाठशाला वाई या छोट्या पण संस्कृतिसंपन्न गावात कै... |
(काही फरक नाही)
|
०६:५०, २७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
वाईची प्राज्ञपाठशाला
वाई या छोट्या पण संस्कृतिसंपन्न गावात कैवल्यानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांनी इ.स. १९०१मध्ये वैदिक शिक्षण देणारी पाठशाळा सुरू केली.
अगदी सुरुवातीच्या काळात या पाठशाळेत वेदविद्येत पारंगत, कर्मकांडांत निष्णात आणि न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादी शास्त्रांचे अध्यापन करणारे संख्येने ५०च्या आसपास विद्वान होते. कैवल्यानंद सरस्वतीचे गुरू प्रज्ञानंद सरस्वती इ.स. १९०४ मध्ये समाधिस्त झाले. त्यांच्या स्मरणार्थ वाईतील या पाठशाळेचे नाव प्राज्ञपाठशाला असे करण्यात आले.
१९१० साली तळेगाव येथे एक अतिशय जुने असे ’समर्थ विद्यालय’ होते. ब्रिटिशांनी ते १९१० साली बंद पाडले. त्या शाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षक वाईच्या प्राज्ञपाठशाळेेत आले. हे सर्वजण राष्ट्रभक्तीनेे प्रेरित झालेले आणि स्वातंत्र्यआंदोलनात भाग घेणारे होते. त्या काळचा राष्ट्रीय क्रांतिकारकांचा गट, आणि लोकमान्य टिळक, अरविंद घोष आदी राष्ट्रीय नेते यांचा प्रभाव पाठशाळेतील विद्यार्थ्यांवर पडत असे. शाळेत संस्कृत शिक्षणाबरोबर इतिहास-भूगोल, ग्णित मराठी साहित्य, संगीत, शारीरिक आणि मैदानी खेळांचे शिक्षण हेही विषय शिकवले जात.
केवलानंद सरस्वती या पाठशाळेत पूर्ण वेळ काम करीत. त्यांच्यासोबत दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर यांनी प्राज्ञपाठशाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य केले
संस्थेचा लौकिक ऐकून महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात दाखल झालेले विनोबा भावे १९१७ साली वेदान्ताच्या अध्ययनासाठी वाईच्या पाठशाळेत दाखल झाले. येथे त्यांनी आठ महिने शांकर तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले. लोकमान्य टिळकांनीही शाळेला भेट देऊन केवलानंद सरस्वती यांच्या समर्पि त जीवनाचा गौरव केला.
आचार्य केवलानंद सरस्वती यांच्या सान्निध्यात राहून संस्थेतील शिक्षक हे अध्यापनाबरोबर प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचे अध्ययनही करीत राहिले. इतिहास संशोधक वि.का. राजवाडे या संस्थेत येऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करीत आणि संशोधनविषय प्रश्न सोडवण्यास उत्सुक असत.
इ.स. १९६२ मध्ये वाईच्या या प्राज्ञापाठशाळेचे महाविद्यालय निघाले. संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व त्यानंतरचे अध्यक्ष प्रा. मे.पुं. रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थे्तून पीएच.डी. केली.
संस्कृत विषयाचे सखोल शिक्षण देणार्या या प्राज्ञपाठशाळेचे हे नवशिक्षणाचे काम सुरूच आहे.