"पारगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळ्यापासून काही अंतरावरच पारगाव हे ठि... |
(काही फरक नाही)
|
१७:२१, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळ्यापासून काही अंतरावरच पारगाव हे ठिकाण आहे. पन्हाळा व ज्योतिबा ही ठिकाणे या गावापासून अगदी जवळच आहेत.
मनपाडळे या तीर्थक्षेत्रापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. या गावात समर्थांनी शके १५७४ मध्ये मारुतीची स्थापना केली. अकरा मारुतींपैकी हा ‘पारगावचा’ मारुती म्हणून ओळखला जातो. मूर्ती सपाट दगडावर कोरलेली आहे. मूर्ती डावीकडे तोंड करून धावत चालली असून, मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी ही मूर्ती सर्वात लहान असून फक्त दीड फूट उंचीची आहे.
या मंदिराचा मूळ घुमट हा ८ फूट लांबीरुंदीचा आहे. मंदिराला नव्यानेच सभामंडप बांधण्यात आला आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा शेवटचा मारुती समजला जातो..