पारगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळ्यापासून काही अंतरावरच पारगाव हे ठिकाण आहे. पन्हाळा व ज्योतिबा ही ठिकाणे या गावापासून अगदी जवळच आहेत. पारगाव हया गावचे दोन भाग पडलेले आहेत एक म्हणजे जुने पारगाव आणि दूसरे म्हणजे नवे पारगाव. जुने पारगाव मध्ये 1953 साली महापूर आल्यामुळे हया गावातील काही लोक नवे पारगाव इथे स्थलांतरीत झाले.

मनपाडळे या तीर्थक्षेत्रापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. या गावात समर्थांनी शके १५७४ मध्ये मारुतीची स्थापना केली. अकरा मारुतींपैकी हा ‘पारगावचा’ मारुती म्हणून ओळखला जातो. मूर्ती सपाट दगडावर कोरलेली आहे. मूर्ती डावीकडे तोंड करून धावत चालली असून, मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी ही मूर्ती सर्वात लहान असून फक्त दीड फूट उंचीची आहे.

या मंदिराचा मूळ घुमट हा ८ फूट लांबीरुंदीचा आहे. मंदिराला नव्यानेच सभामंडप बांधण्यात आला आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा शेवटचा मारुती समजला जातो..