Jump to content

"नग्नसत्य: बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३८: ओळ ३८:


[[मुक्ता मनोहर]] यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांनवर अभ्यास केलेला आहे. त्यांतील अनेक केसेसचा आढावा घेऊन अशा केसेसला राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसा न्याय दिला जातो याची सविस्तरपणे मांडणी केली आहे. बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरांना आणि स्वतः स्त्रियांना अशा घटनांसाठी कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्‍न समाज पातळीवर सुरू असतो, हे मुक्ता मनोहर लक्षात आणून देतात. पुरुष हा स्वतःला कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे त्या लक्षात आणून देतात.<ref name="प्रगती_बाणखेले"/> बलात्काराच्या केसेस जेव्हा न्याय मागण्यांसाठी कोर्टाची पायरी चढतात, तेव्हा आरोपीचे वकील फिर्यादी स्त्रीची कशा प्रकारे खिल्ली उडवतात आणि तिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, असा दावा करतात.
[[मुक्ता मनोहर]] यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांनवर अभ्यास केलेला आहे. त्यांतील अनेक केसेसचा आढावा घेऊन अशा केसेसला राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसा न्याय दिला जातो याची सविस्तरपणे मांडणी केली आहे. बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरांना आणि स्वतः स्त्रियांना अशा घटनांसाठी कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्‍न समाज पातळीवर सुरू असतो, हे मुक्ता मनोहर लक्षात आणून देतात. पुरुष हा स्वतःला कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे त्या लक्षात आणून देतात.<ref name="प्रगती_बाणखेले"/> बलात्काराच्या केसेस जेव्हा न्याय मागण्यांसाठी कोर्टाची पायरी चढतात, तेव्हा आरोपीचे वकील फिर्यादी स्त्रीची कशा प्रकारे खिल्ली उडवतात आणि तिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, असा दावा करतात.

भारतातल्या बलात्कारांविषयी बोलता बोलता जगाच्या बाजारपेठेतला स्त्रियांचा बाजारही लेखिकेने उभा केला आहे. लेखिकेच्या मतानुसार युद्ध हा तर बलात्काराचा मोठा भाऊ. बलात्कार आणि वंशविच्छेदनाचे तर जवळचे नाते आहे. मानवी इतिहासात युद्धांसोबत बलात्कारही नोंदवले गेलेत. जेत्यांचे ते शस्त्र. शत्रूपक्षाला तुम्ही तुमच्या स्त्रियांनाही सांभाळू शकत नाही हे दाखवत त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी शत्रूंच्या बायकांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करणे हे अगदी सगळ्या काळात दिसते. तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी सुद्धा लेखिकेने मते व्यक्त केली आहेत.<ref name="प्रगती_बाणखेले"/>


==टीका==
==टीका==

२३:४१, २० ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

'नग्नसत्य' : बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध
लेखक मुक्ता अशोक मनोहर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार लिंगभाव अभ्यास
प्रकाशन संस्था मनोविकास प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती प्रकाशन प्रथमावृती - आक्टोबर २०११
पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्‌मयासाठीचा .....वर्षीसाठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे.

'नग्नसत्य' हे स्त्रीवादी लेखिका मुक्ता अशोक मनोहर यांचे बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध घेणारे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.[] या ग्रंथामध्ये लेखिका मुक्ता मनोहर यांनी मुख्यत्वे बलात्कारासबंधीच्या अनेक केसेसच्या अभ्यासाद्वारे बलात्काराच्या समस्येचा शोध घेतलेला आहे.

मांडणी

प्रकाशक पाटकर यांच्या मते चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करताना ते अश्‍लील न होऊ देता कमालीचे भेदक होईल याची काळजी घेतली आहे.[] पुस्तक लेखनासाठी लेखिकेने विक्रम-वेताळ या लोककथेचा फॉर्म वापरला आहे.[] प्रगती बाणखेले यांच्या मतानुसार सुरुवातीला या फॉर्ममध्ये हा विषय वाचताना अवघडलेपण येते. पण नंतर त्याच्या लवचीकपणाचे फायदे लक्षात येतात. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून कथन करता येणे, विश्लेषण करत केलेली चर्चा, तर कधी आत्मसंवाद, तर . बलात्कारी वेताळाशी पंचवीस रात्रींमध्ये झालेला संवाद असे रूप घेऊन पुस्तक समोर येत असल्यामुळे बलात्काराचे भयानक रूपही थोडे सौम्य आणि वाचनीय होते. लेखनाच्या वेताळ पंचविशी या फॉर्ममुळे लेखन अतिभडक व कर्कश होण्याचा धोका, अथवा दुसरीकडे अतिहळवे होण्याचा आणि विषयाचे गांभीर्य कमी होण्याची भीती आणि तोचतोपणाही येण्याचा धोकाही टळला आहे. []

आशय

मुक्ता मनोहर यांच्या म्हणण्यानुसार व्यापक सामाजिक संदर्भात त्यांनी हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. "स्त्रियाच पुरुषांना मोहात पाडतात किंवा केवळ पुरुषी विकृतीतून बलात्कार होतात हे खरे नाही. टोळीवाद, गणवाद, जातवाद, धर्मवाद, देशवाद, बाजारपेठीय वर्चस्ववाद-चंगळवाद, जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्धखोरी हे सगळेच बलात्काराचे खास दोस्त आहेत" अशी टीका लेखिका मुक्ता मनोहर त्यांच्या या ग्रंथाच्या माध्यमातून करतात. []

दीपा कदम यांच्या मतानुसार बलात्काराच्या सत्यघटना कथा स्वरूपामध्ये वाचताना बलात्काराच्या विविध कंगोर्‍यांचा विचार केला गेला आहे. स्त्री आणि पुरुष संबंधाच्या नाण्याची चिकित्सा केवळ बलात्कारापुरती सीमित न ठेवता लेखिकेने मानवी इच्छा, पुरुषी वर्चस्व, भांडवलशाही, चंगळवाद यांच्या चष्म्यातूनदेखील बलात्काराशी संवाद साधला आहे. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात, हे प्रमाण मान्य करून बलात्काराच्या घटनेची चिरफाड केली आहे. पुरुषाने जबरदस्तीने स्त्रीवर केलेले आक्रमण किंवा संभोग या वर्तुळाच्या बाहेर जाऊन बलात्काराविषयीची केलेली चर्चा या विषयावर वाचकास विचार करायला भाग पाडते.[]

नीला शर्मा यांच्या मते घरांघरातल्या लेकी-सुनांना सावधपणाचा मंत्र देण्याबरोबरच पुरुषांना बलात्काराच्या मोहापासून रोखण्याची क्षमतासुद्धा मुक्ता मनोहर यांनी मांडलेल्या कथानकांतून जाणवते.[]

मुक्ता मनोहर यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांनवर अभ्यास केलेला आहे. त्यांतील अनेक केसेसचा आढावा घेऊन अशा केसेसला राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसा न्याय दिला जातो याची सविस्तरपणे मांडणी केली आहे. बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरांना आणि स्वतः स्त्रियांना अशा घटनांसाठी कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्‍न समाज पातळीवर सुरू असतो, हे मुक्ता मनोहर लक्षात आणून देतात. पुरुष हा स्वतःला कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे त्या लक्षात आणून देतात.[] बलात्काराच्या केसेस जेव्हा न्याय मागण्यांसाठी कोर्टाची पायरी चढतात, तेव्हा आरोपीचे वकील फिर्यादी स्त्रीची कशा प्रकारे खिल्ली उडवतात आणि तिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, असा दावा करतात.

भारतातल्या बलात्कारांविषयी बोलता बोलता जगाच्या बाजारपेठेतला स्त्रियांचा बाजारही लेखिकेने उभा केला आहे. लेखिकेच्या मतानुसार युद्ध हा तर बलात्काराचा मोठा भाऊ. बलात्कार आणि वंशविच्छेदनाचे तर जवळचे नाते आहे. मानवी इतिहासात युद्धांसोबत बलात्कारही नोंदवले गेलेत. जेत्यांचे ते शस्त्र. शत्रूपक्षाला तुम्ही तुमच्या स्त्रियांनाही सांभाळू शकत नाही हे दाखवत त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी शत्रूंच्या बायकांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करणे हे अगदी सगळ्या काळात दिसते. तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी सुद्धा लेखिकेने मते व्यक्त केली आहेत.[]

टीका

साप्ताहिक सकाळ मध्ये दीपा कदम यांनी त्यांच्या लेखातून, 'पुस्तकात अनेकदा नको इतकी खोलातली माहिती दिली जाते अशी टीका केली आहे.[] महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभ लेखिका प्रगती बाणखेले यांच्या मतानुसार, 'बलात्कारी वेताळ पुस्तकात सतत तो निर्गुण निराकार असल्याचा (कंटाळा यावा इतक्या वेळा) दावा करतो. पण त्याचे सगळे चेहरे लेखिकेने उघड केले आहेत. युद्धखोरी, दहशतवाद, पुरुषसत्ताकता, बाजारपेठेची हुकूमशाही, चंगळवाद, मूलतत्त्ववाद या सगळ्यांशी नाते सांगणार्‍या बलात्कारी वेताळाला संपवण्यासाठी काय करायचे, हे मात्र थोडक्यात गुंडाळले आहे..[] बुकगंगा डॉट कॉमवरील सर्वसामान्य वाचक संतोष पाटील यांच्या पुस्तक-समीक्षणानुसार पुस्तकाच्या मलपृष्ठावरील दाव्यास अनुसरून बलात्कारी संस्कृती केव्हा आणि कशी निर्माण झाली याची माहिती प्रत्यक्ष पुस्तकात मिळत नाही. पुस्तक भारतीय पुरुष प्रधान संस्कृती आणि धर्मग्रंथांवर पुरेशी टीका करत नाही. लेखिकेने एक गंभीर विषय बालिशपणे हाताळला आहे.[]

संदर्भ

  1. ^ a b c मुक्ता अशोक मनोहर. pp. पृष्ठे ३०२ http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5430962264594418133. Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b नीला शर्मा. http://www.esakal.com/eSakal/20120122/5721043518555762704.htm. "ई-सकाळवरील पुरुषी दहशतीमागचे सामाजिक संदर्भ-नीला शर्मा यांचा लेख दिनांक २० ऑगस्ट इ.स. २०१५ भाप्रवे दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी वाचला रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b c d प्रगती_बाणखेले. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11851122.cms. "बलात्कारी वेताळाची न संपणारी कहाणी"-प्रगती_बाणखेले यांचा लेख दिनांक २० ऑगस्ट २०१५ भाप्रवे दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी वाचला रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ a b दीपा_कदम. http://www.globalmarathi.com/20120207/5293321629569813000.htm. "एका भीषण वास्तवाचा वेध-दीपा_कदम यांचा लेख दिनांक २० ऑगस्ट २०१५ भाप्रवे दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी वाचला रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ संतोष_पाटील. (इंग्रजी भाषेत) http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5430962264594418133. "बलात्कारी वेताळाची न संपणारी कहाणी"-प्रगती_बाणखेले यांचा लेख दिनांक २० ऑगस्ट २०१५ भाप्रवे दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी वाचला रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)