"एच इंडेक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एच इंडेक्स हा संशोधकाच्या लिहिलेल्या परिणामकारक शोधपत्रिकांचे...
(काही फरक नाही)

२३:३१, १५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

एच इंडेक्स हा संशोधकाच्या लिहिलेल्या परिणामकारक शोधपत्रिकांचे मूल्यमापन करणारा निर्देशांक आहे. जितके शोधनिबंध जास्त तितका एच निर्देशांक मोठा. निर्देशांक ठरविण्यासाठी ते शोधनिबंध कुठे प्रकाशित झाले ते विचारात घेतले जात नाही.

एच निर्देशांक कसा मोजतात?

यासाठी दोन गोष्टींची गरज असते. पहिली म्हणजे संशोधकाच्या शोधनिबंधांची संख्या (Np) आणि दुसरी त्या प्रत्येक निबंधाच्या अन्य संशोधकांनी केलेल्या उल्लेखांची किंवा निबंधांतून घेतलेल्या उद्धरणांची संख्या (Nc). Nc म्हणजे नंबर ऑफ सायटेशन्स.

स्वतःचा एच इंडेक्स कसा मोजावा?

समजा मी एक शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे, आणि तिला कमीतकमी एक सायटेशन मिळाले. तर माझा एच निर्देशांक एक असेल. दोन निबंध प्रसिद्ध केले आणि त्या प्रत्येकाला दोन किंवा त्याहून जास्त सायटेशन्स मिळाली तर माझा एच निर्देशांक दोन असेल. जेव्हा शोधनिबंधांच्या संख्येपेक्षा दरेक निबंधाला मिळणार्‍या सायटेशन्सची संख्या कमी होईल तेव्हा मोजणी थांबवावी लागेल.

थोडक्यात

संशोधकाने प्रसिद्ध शोधनिबधांपैकी क्ष निबंधांना प्रत्येकी किमान क्ष उल्लेखने किंवा उद्धरणे मिळाली तर त्या संशोधकाचा क्ष हा एच-इंडेक्स असेल.