एच इंडेक्स
एच इंडेक्स हा संशोधकाच्या लिहिलेल्या परिणामकारक शोधपत्रिकांचे मूल्यमापन करणारा निर्देशांक आहे.
एच निर्देशांक मापनपद्धती
[संपादन]एच निर्देशांक ठरविण्यात अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. जितके शोधनिबंध जास्त तितका एच निर्देशांक मोठा असतो. निर्देशांक ठरविण्यासाठी ते शोधनिबंध कुठे प्रकाशित झाले ते विचारात घेतले जात नाही. संशोधकाच्या शोधनिबंधांची संख्या (Np) आणि दुसरी त्या प्रत्येक निबंधाच्या अन्य संशोधकांनी केलेल्या उल्लेखांची किंवा निबंधांतून घेतलेल्या उद्धरणांची संख्या (Nc- नंबर ऑफ सायटेशन्स) यांवरही हा निर्देशांक ठरतो.
उदाहरण
[संपादन]एक शोधपत्रिका प्रसिद्ध केली आणि तिला कमीतकमी एक सायटेशन मिळाले, तर लेखकाचा एच निर्देशांक एक असेल. दोन निबंध प्रसिद्ध केले आणि त्या प्रत्येकाला दोन किंवा त्याहून जास्त सायटेशन्स मिळाली तर लेखकाचा एच निर्देशांक दोन असेल. जेव्हा शोधनिबंधांच्या संख्येपेक्षा प्रत्येक निबंधाला मिळणाऱ्या सायटेशन्सची संख्या कमी असेल तेव्हा मोजणी थांबते.
समीकरण
[संपादन]संशोधकाने प्रसिद्ध शोधनिबधांपैकी क्ष निबंधांना प्रत्येकी किमान क्ष उल्लेखने किंवा उद्धरणे मिळाली तर क्ष हा त्या संशोधकाचा एच-इंडेक्स असेल.
डॉ. दीपक प्रकाश डुबल
[संपादन]बार्सिलोनामध्ये संशोधन करत असलेले मराठी शास्त्रज्ञ डॉ.दीपक डुबल यांचा एच निर्देशांक २७ आहे.
जे.ई. हर्श (J.E. Hirsch)
[संपादन]ह्या निर्देशांकाची कल्पना मांडणाऱ्या जे.ई. हर्श या शास्त्रज्ञाच्या नावाच्या एच ह्या आद्याक्षरावरून या संशोधन मापनाच्या एककाला एच-इंडेक्स म्हणतात.