Jump to content

"ओमप्रकाश मुंजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''ओमप्रकाश मुंजाल''' (जन्म : कमालिया -आता पाकिस्तानात, २६ ऑगस्ट, इ,स, १...
(काही फरक नाही)

१९:२५, १५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

ओमप्रकाश मुंजाल (जन्म : कमालिया -आता पाकिस्तानात, २६ ऑगस्ट, इ,स, १९२८, मत्यू : लुधियाना-भारत, १३ ऑगस्ट, इ.स. २०१५) हे भारतातल्या हीरो सायकल कंपनीचे संस्थापक होते.

पुढे प्रमुख उद्योगपती झालेले ओमप्रकाश मुंजाल यांचा जन्म एका छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांनी आणि त्यांचे भाऊ ब्रिजमोहन लाल, दयानंद आणि सत्यानंद यांनी १९४४ मध्ये सायकलीचे सुटे भाग विकण्याचा व्यवसाय अमृतसर येथे सुरू केला.

हीरो सायकल्सची स्थापना

पुढे मुंजाल कुटुंब लुधियानामध्ये स्थायिक झाले. ओमप्रकाश यांना सायकलींचे सुटे भाग विकतानाच हे भाग स्वतः तयार करून त्यापासून पुढे सायकल तयार करावी अशी कल्पना सुचली. त्याला मूर्त रूप देण्याचा ध्यास घेत १९५६मध्ये त्यांनी हीरो सायकल्सची स्थापना केली.

ओमप्रकाश मुंजाल यांनी १९५६मध्ये वर्षभरात ६३९ सायकलींचे उत्पादन केलो होते. २०१५ साली ही कंपनी दिवसाला १८ हजार ५०० सायकलींचे उत्पादन करत आहे. जगात सायकलींच्या उत्पादनात हे सर्वाधिक उत्पादन आहे. हीरो सायकल्समध्ये चार युनिट असून त्यांत एकूण ७ हजार कर्मचारी आहेत. या कंपनीच्या वाटचालीची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १९८६मध्ये घेतली होती.

निधन

मुंजाल यांच्या पत्‍नीचे फेब्रुवारी २०१५मध्ये निधन झाल्यानंतर ते मनाने एकाकी झाले होते. कदाचित त्यामुळे, अल्पशा आजाराने सहा महिन्यांत त्यांचीही प्राणज्योत मालवली. ध्येयासाठी झपाटल्यागत काम करणे आणि मनात ठरवलेले लक्ष्य गाठणे यासाठी मुंजाल प्रसिद्ध होते.

ओमप्रकाश यांची कंपन्यांमधील पदे

  • हीरो सायकल्स लिमिटेडचे सहअध्यक्ष
  • हीरो ब्रिग्स तसेच स्ट्रॅटन अॅन्ड मॅजेस्टिक ऑटो लिमिटेड या कंपन्यांचे अध्यक्ष .
  • हीरो होंडा मोटर्स, रॉकमन सायकल इंडस्ट्रीज, हायवे सायकल इंडस्ट्रीज, या कंपन्यांचेे संचालक
  • ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रेसिडेन्ट