ओमप्रकाश मुंजाल
ओमप्रकाश मुंजाल (२६ ऑगस्ट, इ.स. १९२८:कमालिया, पाकिस्तान - १३ ऑगस्ट, इ.स. २०१५:लुधियाना, पंजाब, भारत) हे भारतीय उद्योगपती होते. मुंजाल भारतातील हीरो सायकल कंपनीचे संस्थापक होते.
ओमप्रकाश मुंजाल यांचा जन्म एका छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांनी आणि त्यांचे भाऊ ब्रिजमोहन लाल, दयानंद आणि सत्यानंद यांनी १९४४ मध्ये सायकलीचे सुटे भाग विकण्याचा व्यवसाय अमृतसर येथे सुरू केला.
हीरो सायकल्सची स्थापना
[संपादन]पुढे मुंजाल कुटुंब लुधियानामध्ये स्थायिक झाले. ओमप्रकाश यांना सायकलींचे सुटे भाग विकतानाच हे भाग स्वतः तयार करून त्यापासून पुढे सायकल तयार करावी अशी कल्पना सुचली. त्याला मूर्त रूप देण्याचा ध्यास घेत १९५६मध्ये त्यांनी हीरो सायकल्सची स्थापना केली.
ओमप्रकाश मुंजाल यांनी १९५६मध्ये वर्षभरात ६३९ सायकलींचे उत्पादन केलो होते. २०१५ साली ही कंपनी दिवसाला १८ हजार ५०० सायकलींचे उत्पादन करत आहे. जगात सायकलींच्या उत्पादनात हे सर्वाधिक उत्पादन आहे. हीरो सायकल्समध्ये चार युनिट असून त्यांत एकूण ७ हजार कर्मचारी आहेत. या कंपनीच्या वाटचालीची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १९८६मध्ये घेतली होती.
निधन
[संपादन]मुंजाल यांच्या पत्नी सुदर्शन यांचे फेब्रुवारी २०१५मध्ये निधन झाल्यानंतर ते मनाने एकाकी झाले होते. सहा महिन्यांत अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला.
ओमप्रकाश यांची कंपन्यांमधील पदे
[संपादन]- हीरो सायकल्स लिमिटेडचे सहअध्यक्ष
- हीरो ब्रिग्स तसेच स्ट्रॅटन अँड मॅजेस्टिक ऑटो लिमिटेड या कंपन्यांचे अध्यक्ष
- हीरो होंडा मोटर्स, रॉकमन सायकल इंडस्ट्रीज, हायवे सायकल इंडस्ट्रीज या कंपन्यांचे संचालक
- ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष