Jump to content

"नासीर काझमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नासीर रझा काझमी (जन्म : अंबाला, ८ डिसेंबर, इ.स. १९२५; मृत्यू : लाहोर, २...
(काही फरक नाही)

२३:००, ९ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

नासीर रझा काझमी (जन्म : अंबाला, ८ डिसेंबर, इ.स. १९२५; मृत्यू : लाहोर, २३ मार्च, इ.स. १९७२) हे एक निसर्गप्रेमी उर्दू गझलकार होते.

नासीर काझमी यांचे वडील वडील सुलतान काझमी, सैन्यात सुभेदार मेजर होते. फाळणीमुळे हे कुटुंब इ.स. १९४७ साली लाहोरला स्थलांतरित झाले. नासीरचेे शिक्षण पेशावर, अंबाला व लाहोर येथे झाले. त्यांच्या पत्‍नीचे नाव शफीका बेगम होते.

नासीर काझमीने 'औराके नौ' (नवीन पाने) या नावाचे मासिक काढले होते. त्यानंतर 'हुमायूँ', 'ख़याल', 'हम लोग अशी साहित्यविषयक मासिके संपादित केली. ते १९६४ ते निधनापर्यंत रेडिओ पाकिस्तानचे स्टाफ आर्टिस्ट होते.

त्यांचा पहिला गझलसंग्रह सोडला तर बाकीचे त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. नसीर काझमी लाहोरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये वयाच्या केवळ ४६व्या वर्षी पोटाच्या कॅन्सरमुळे मरण पावले.

नासीर काझमी यांचे काव्यसंग्रह

  • इंतखाब-ए-इन्शा (कवितासंग्रह, १९९१)
  • इंतखाब-ए-नझीर (कवितासंग्रह, १९९०)
  • इंतखाब-ए-मीर (कवितासंग्रह, १९८९)
  • इंतखाब-ए-वली (कवितासंग्रह, १९९१)
  • काझमी : निबंध, संवाद, श्रुतिका, आदी रेडियो कार्यक्रम, संपादकीये आणि मुलाखती, १९९०)
  • खुश्क चश्मे के किनारे (गद्य, १९८२)
  • दीवान (१९७२)
  • नासीर काझमी की डायरी (१९९५)
  • निशात-ए-ख्वाब (कवितासंग्रह, १९७७)
  • पहली बारिश (गझलसंग्रह, १९७५)
  • बर्ग-ए-नै (पहिला गझलसंग्रह, १९५२)
  • सूर की छाया (नाट्यकाव्य, १९८१)

सन्मान

नासीरच्या पहिल्या स्मृतिदिनी पाकिस्तानने त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे १५ रुपयाचे तिकिट छापलेे होते.