नासीर काझमी
नासीर रझा काझमी (८ डिसेंबर, इ.स. १९२५:अंबाला, पंजाब, भारत- २३ मार्च, इ.स. १९७२:लाहोर, पाकिस्तान) हे एक निसर्गप्रेमी उर्दू गझलकार होते.
नासीर काझमी यांचे वडील वडील सुलतान काझमी, सैन्यात सुभेदार मेजर होते. फाळणीमुळे हे कुटुंब इ.स. १९४७ साली लाहोरला स्थलांतरित झाले. नासीरचे शिक्षण पेशावर, अंबाला व लाहोर येथे झाले. त्यांच्या पत्नीचे नाव शफीका बेगम होते.
नासीर काझमीने औराके नौ (नवीन पाने) या नावाचे मासिक काढले होते. त्यानंतर हुमायूॅं, खयाल, हम लोग अशी साहित्यविषयक मासिके संपादित केली. ते १९६४ ते निधनापर्यंत रेडियो पाकिस्तानचे स्टाफ आर्टिस्ट होते.
त्यांच्या पहिल्या गझलसंग्रहाव्यतिरिक्त त्यांचे सगळे साहित्य त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. नसीर काझमी लाहोरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये वयाच्या ४६व्या वर्षी पोटाच्या कॅन्सरमुळे मरण पावले.
नासीर काझमी यांचे काव्यसंग्रह
[संपादन]- इंतखाब-ए-इन्शा (कवितासंग्रह, १९९१)
- इंतखाब-ए-नझीर (कवितासंग्रह, १९९०)
- इंतखाब-ए-मीर (कवितासंग्रह, १९८९)
- इंतखाब-ए-वली (कवितासंग्रह, १९९१)
- काझमी : निबंध, संवाद, श्रुतिका, आदी रेडियो कार्यक्रम, संपादकीये आणि मुलाखती, १९९०)
- खुश्क चश्मे के किनारे (गद्य, १९८२)
- दीवान (१९७२)
- नासीर काझमी की डायरी (१९९५)
- निशात-ए-ख्वाब (कवितासंग्रह, १९७७)
- पहली बारिश (गझलसंग्रह, १९७५)
- बर्ग-ए-नै (पहिला गझलसंग्रह, १९५२)
- सूर की छाया (नाट्यकाव्य, १९८१)
सन्मान
[संपादन]नासीरच्या पहिल्या स्मृतिदिनी पाकिस्तानने त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे १५ रुपयाचे तिकिट छापले होते.