"प्रवीण तरडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रवीण तरडे हे एक मराठी नाट्य-चित्रपट-मालिका लेखक व दिग्दर्शक आह... |
(काही फरक नाही)
|
१४:३१, ५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
प्रवीण तरडे हे एक मराठी नाट्य-चित्रपट-मालिका लेखक व दिग्दर्शक आहेत.
प्रवीण तरडेंचा नाट्य-चित्र या क्षेत्राशी, तसा काहीच संबंध नव्हता. ते शाळा-कॉलेजात असताना कबड्डी, सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते. एक दिवस यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिण्याची संधी त्यांना मिळाली आणि नाट्य-चित्र सृष्टीचा त्यांचा प्रवास सुरू झाला.
सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत. यांच्यासारख्या साह्याने तरडे यांनी नाट्यक्षेत्रातल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
प्रवीण तरडे यांचे नाट्यलेखन
- कुंकू (तरडे यांची दूरचित्रवाणी मालिका)
- पिंजरा (दूरचित्रवाणी मालिका)
- तुझं माझं जमेना (दूरचित्रवाणी मालिका)
- कन्यादान (दूरचित्रवाणी मालिका)
- कुटुंब (चित्रपटाची कथा)
- पितृऋण (पटकथा व संवाद)
- रेगे (पटकथा व संवाद)
दिग्दर्शन
- कोकणस्थ (साहाय्यक दिग्दर्शक)
- देऊळ बंद (दिग्दर्शक)