"पिस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पिस्ता ((इंग्रजीत पिस्टाशिओ - Pistachio किंवा Green Almond) हे छोटय़ा आकाराचे चव...
(काही फरक नाही)

०९:३८, २ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

पिस्ता ((इंग्रजीत पिस्टाशिओ - Pistachio किंवा Green Almond) हे छोटय़ा आकाराचे चविष्ट व कठीण कवचाचे पौष्टिक फळ आहे.

पिस्त्याचेे कवच टणक, परंतु द्विदल असते. त्याच्या गरावर एक साल असते. आतील गराचा रंग हिरवट पिवळा असतो. पिस्त्याचे झाड आकाराने खूप मोठे व डौलदार असते. त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूंनी सारख्या असून पानांनी बहरलेल्या असतात. पिस्त्याची झाडे इराण, अफगाणिस्तान, फ्रान्स, अमेरिका, तुर्कस्तान या भागामध्ये जास्त आढळतात.

पिस्त्याला संस्कृतमध्ये म्युकुलका, निकोटक किंवा निकोचक व शास्त्रीय भाषेत पिस्ताशिया व्हेरा (Pistacia vera) या नावाने ओळखले जाते.

पिस्त्याचे गुणधर्म

पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचे पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.