"कृष्णराव अर्जुन केळूसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: गुरुवर्य कृ.अ. केळूसकर (जन्म : केळूस (वेंगुर्ले तालुका), २० ऑगस्ट, इ.... |
No edit summary |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
* [[तुकाराम]] |
* [[तुकाराम]] |
||
* माधवराव रोकडे |
* माधवराव रोकडे |
||
* म्यूर मॅकेंझी |
|||
* रामचंद्र विठोबा धामणस्कर |
* रामचंद्र विठोबा धामणस्कर |
||
* [[शिवाजी]] |
* [[शिवाजी]] |
||
==केळूसकरांनी लिहिलेली अन्य पुस्तके== |
==केळूसकरांनी लिहिलेली अन्य पुस्तके== |
||
* टोम पेनच्या ’राइट्स ऑफ मॅन’चे मराठी भाषांतर |
|||
* नीति बोध माला (कथासंग्रह) |
|||
* फ्रान्सच्या जुन्या इतिहासाचे भाषांतर ([[बडोदा|बडोद्याच्या]] [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या विनंतीवरून केलेले काम) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* ६ ऑक्टोबर, १९३४ रोजी मुंबईत भरलेल्या पहिल्या मुंबई [[मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद |
* ६ ऑक्टोबर, १९३४ रोजी मुंबईत भरलेल्या पहिल्या मुंबई [[मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद |
||
* तुकारामाच्या चरित्राला [[महादेव गोविंद रानडे|न्यायमूर्ती रानड्यांच्या]] शिफारसीवरून मिळालेले दक्षिणा प्राइज कमिटीचे पारितोषिक |
|||
२०:०७, २१ जुलै २०१५ ची आवृत्ती
गुरुवर्य कृ.अ. केळूसकर (जन्म : केळूस (वेंगुर्ले तालुका), २० ऑगस्ट, इ.स. १८६०; मृत्यू : मुंबई, १४ ऑक्टोबर, इ.स. १९३४) हे एक मराठीतील महत्त्वाचे चरित्रकार, भाषांतरकार, वक्ते, विचारवंत, सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते व ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ होते.
शिक्षण
गरीब मराठा समाजात जन्मलेले केळूसकर मॅट्रिक झाले आणि शिक्षकाची नोकरी करू लागले. विद्यार्थिदशेत आणि नोकरी करीत असताना केळूसकरांनी विविध विषयांवर सूक्ष्म आणि चौफेर वाचन केले. त्यांतून ते निरीश्वरवादी व नीतिवादी बनले.
वाङ्मयसेवेची सुरुवात
केळूसकरांना नोकरी मिळवून देणारे ज्यू सद्गृहस्थ हाईम किहीमकर यांच्या प्रेरणेने कृष्णराव लेखन करू लागले. किहीमकरांसाठी केळूसकरांनी बायबलच्या ’जुन्या करारा’च्या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. पुढे हाईमसाहेबांनी सुरू केलेले ’इस्राएल’ नावाचे साप्ताहिक केळूसकरांनी चालविले. त्या साप्ताहिकातून ते लंडनमधून निघणार्या ’ज्युइश क्रॉनिकल’ नावाच्या नियतकालिकातील मजकुराचे मराठी भाषांतर प्रसिद्ध करीत व प्रसंगी स्वतंत्र लेखही लिहीत. याच काळात रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे या ब्राह्मणेतर नेत्याने चालविलेल्या ’दीनबंधु’ वृत्तपत्रातूनही केळूसकर लिहू लागले. त्या पत्रात ब्राह्मणशाही विरुद्ध केळूसकरांनी केलेल्या भाषणांचे वृत्तान्तही छापून येत. त्यामुळे केळूसकरांची बरीच प्रसिद्धी झाली.
प्रार्थना समाजाचे एक कार्यकर्ते मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या ’सुबोधपत्रिका’ व ’सुबोधप्रकाश’ या नियतकालिकांतूनही केळूसकरांनी लिखाण केले.
केळूसकरांनी लिहिलेली चरित्रे
- एल्लाप्पा बाळाराम (१९१४)
- गुणाजीराव घुले
- स्वामी गोविंद जनार्दन बोरकर
- गौतम बुद्ध
- जनाबाई रोकडे
- तुकाराम
- माधवराव रोकडे
- म्यूर मॅकेंझी
- रामचंद्र विठोबा धामणस्कर
- शिवाजी
केळूसकरांनी लिहिलेली अन्य पुस्तके
- टोम पेनच्या ’राइट्स ऑफ मॅन’चे मराठी भाषांतर
- नीति बोध माला (कथासंग्रह)
- फ्रान्सच्या जुन्या इतिहासाचे भाषांतर (बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या विनंतीवरून केलेले काम)
केळूसकरांना मिळालेले सन्मान
- ६ ऑक्टोबर, १९३४ रोजी मुंबईत भरलेल्या पहिल्या मुंबई मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- तुकारामाच्या चरित्राला न्यायमूर्ती रानड्यांच्या शिफारसीवरून मिळालेले दक्षिणा प्राइज कमिटीचे पारितोषिक
(अपूर्ण)