"मोरेश्वर सावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २: | ओळ २: | ||
==शिक्षण आणि राजकीय कारकीर्द== |
==शिक्षण आणि राजकीय कारकीर्द== |
||
मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. |
मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वाॅर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला आणि नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात त्याच महापालिकेत महापौर बनले. त्यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले. |
||
==महापौरांची शिस्त== |
|||
मोरेश्वर सावे हे त्यांच्या शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. ते महापौर असताना त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊ दिला नाही. कारण एक दिवस आधीच सदस्यांच्या प्रश्नांची ते यादी घेत. त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांशिवाय कोणालाही सभागृहात बोलण्याची परवानगी नव्हती. अवांतर विषयावर बोलण्यासही मनाई होती. इतकेच काय, महापौरांच्या दालनात कोणीही केव्हाही यायचे नाही, असाही दंडक त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापौरांचे दालन उघडे असले तरी काम असेल तरच या, असा थेट कायदाच त्यांच्या काळात होता. राजकारणात शिस्तीत जगता येते, असे त्यांनी दाखवून दिले होते. ते स्वत: शिस्तीत वागत असल्याने त्यांच्या आदेशापुढे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांच्यानंतर शिस्तीचा भोक्ता असा महापौर शहराला लाभला नाही. |
|||
==सांस्कृतिक कार्य== |
==सांस्कृतिक कार्य== |
२१:१५, १७ जुलै २०१५ ची आवृत्ती
मोरेश्वर दीनानाथ सावेे (जन्म : चिंचणी-ठाणे, १४ फेब्रुवारी, १९३१; मृत्यू : औरंगाबाद, १६ जुलै, २०१५) हे लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे पहिले खासदार होते.
शिक्षण आणि राजकीय कारकीर्द
मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वाॅर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला आणि नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात त्याच महापालिकेत महापौर बनले. त्यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले.
महापौरांची शिस्त
मोरेश्वर सावे हे त्यांच्या शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. ते महापौर असताना त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊ दिला नाही. कारण एक दिवस आधीच सदस्यांच्या प्रश्नांची ते यादी घेत. त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांशिवाय कोणालाही सभागृहात बोलण्याची परवानगी नव्हती. अवांतर विषयावर बोलण्यासही मनाई होती. इतकेच काय, महापौरांच्या दालनात कोणीही केव्हाही यायचे नाही, असाही दंडक त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापौरांचे दालन उघडे असले तरी काम असेल तरच या, असा थेट कायदाच त्यांच्या काळात होता. राजकारणात शिस्तीत जगता येते, असे त्यांनी दाखवून दिले होते. ते स्वत: शिस्तीत वागत असल्याने त्यांच्या आदेशापुढे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांच्यानंतर शिस्तीचा भोक्ता असा महापौर शहराला लाभला नाही.
सांस्कृतिक कार्य
हैदराबाद मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग घेतलेल्या मोरेश्वर सावे यांचे औरंगाबादच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातही मोलाचे योगदान राहिले.
सावे हे औरंगाबाद बुद्धिबळ संघटनेचे, नादब्रह्म या सांस्कृतिक संघटनेचे आणि मराठवाडा सिनेमा एक्झिबिटर्स असोशिएनचे अध्यक्ष होते.
उद्योगक्षेत्र
सावे यांनी औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. ते चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरचे १९८५ ते ८७ या काळात उपाध्यक्ष तर १९८७-८९ या काळात अध्यक्ष होते.
कौटुंबिक
मोरेश्वर सावे यांच्या पत्नीचे नाव लीलावती. अनिल, अजित व आमदार अतुल सावे ही तीन मुले आणि अंजली ही त्यांची विवाहित कन्या होय.