"मोरेश्वर सावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मोरेश्वर दीनानाथ सावेे (जन्म : चिंचणी-ठाणे, १४ फेब्रुवारी, १९३१; मृ... |
(काही फरक नाही)
|
२१:०७, १७ जुलै २०१५ ची आवृत्ती
मोरेश्वर दीनानाथ सावेे (जन्म : चिंचणी-ठाणे, १४ फेब्रुवारी, १९३१; मृत्यू : औरंगाबाद, १६ जुलै, २०१५) हे लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे पहिले खासदार होते.
शिक्षण आणि राजकीय कारकीर्द
मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. १९८८मध्ये ते पहिल्याच निवडणुकीत औरंगाबाद महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून गेल्यापासून सावे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात त्याच महापालिकेत महापौर बनले. त्यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले.
सांस्कृतिक कार्य
हैदराबाद मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग घेतलेल्या मोरेश्वर सावे यांचे औरंगाबादच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातही मोलाचे योगदान राहिले.
सावे हे औरंगाबाद बुद्धिबळ संघटनेचे, नादब्रह्म या सांस्कृतिक संघटनेचे आणि मराठवाडा सिनेमा एक्झिबिटर्स असोशिएनचे अध्यक्ष होते.
उद्योगक्षेत्र
सावे यांनी औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. ते चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरचे १९८५ ते ८७ या काळात उपाध्यक्ष तर १९८७-८९ या काळात अध्यक्ष होते.
कौटुंबिक
मोरेश्वर सावे यांच्या पत्नीचे नाव लीलावती. अनिल, अजित व आमदार अतुल सावे ही तीन मुले आणि अंजली ही त्यांची विवाहित कन्या होय.