"वैभव मांगले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४९: | ओळ ४९: | ||
* वैभव मांगले यांचा २३-११-२०१० रोजी [[देवरूख]]ला गावकर्यांनी सत्कार केला होता. |
* वैभव मांगले यांचा २३-११-२०१० रोजी [[देवरूख]]ला गावकर्यांनी सत्कार केला होता. |
||
* कलारंग कलागौरव पुरस्कार (२०१३). |
* कलारंग कलागौरव पुरस्कार (२०१३). |
||
* झी मराठी पुरस्कार (’शेजारी शेजारी...” मधील बी.एल. पाठक या विनोदी भूमिकेसाठी) |
|||
[[वर्ग:मराठी अभिनेते]] |
[[वर्ग:मराठी अभिनेते]] |
१३:५८, १७ जुलै २०१५ ची आवृत्ती
वैभव मांगले (जन्म : देवरूख, ७ जून, १९७५) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातले देवरूख. त्यांना गाणे शिकायचे होते, मराठीचा प्राध्यापकहीही व्हायचे होते. बी.एस्सी. बी.एड. डी.एड.झाल्यावर कोठेही नोकरी मिळेना. म्हणून काकांनी मुंबईला पाठवले. मुंबईत मित्राच्या एका खोलीत दहाबारांज्णांबरोबर राहून नोकरी मिळवायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. त्यावेळी आविष्कार या नाट्यसंस्थेशी संबंध आला, आणि अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. नाटकांमध्ये त्यांनी स्त्री-भूमिकाही केल्या आहेत. ग्रामीण नाटकांमध्ये वैभव मांगले हे कोकणी, मालवणी, वर्हाडी या बोलीभाषा सफाईने बोलतात.
वैभव मांगले यांच्याकडे त्यांच्या आजोबा आणि वडील यांच्याकडून आलेली उपजत अभिनयाची कला आहे.
वैभव मांगले यांची भूमिका असलेली नाटके
- एक डाव भुताचा
- करून गेलो गाव (स्त्री-भूमिका)
- पांडगो इलो रे बा इलो
- मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (वैभव मांगले यांचे पहिले नाटक, दिग्दर्शक - परेश मोकाशी)
- लग्नकल्लोळ
- वाडा चिरेबंदी
- वासूची सासू
- व्यक्ती आणि वल्ली
- सूर्याची पिल्ले
- सं.सौभद्र नाटकातला एक प्रवेश (रुक्मिणीची भूमिका, कृणाच्या भूमिकेत अजय पूरकर - दूरचित्रवाणीवर झालेला कार्यक्रम)
दूरचित्रवाणी मालिका
- कुंकू
- घडलंय बिघडलंय
- फू बाई फू (या मालिकेत स्त्री-भूमिकाही होती.)
- शेजारी शेजारी पक्के शेजारी
चित्रपट
- आया सावन झूमके
- उचला रे उचला
- काकस्पर्श
- कोकणस्थ - ताठ कणा हाच बाणा
- चांदी
- टाइमपास - १ (दिग्दर्शक - रवी जाधव) (या चित्रपटातील जिंदगी जिंदगी या कोरस-गाण्यात वैभव मांगले यांचाही आवाज आहे.)
- टाइमपास - २
- टूरिंग टॉकीज
- दुनियादारी (मराठी चित्रपट)।दुनियादारी
- नवरा माझा नवसाचा
- पिपाणी
- पोस्ट कार्ड
- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
- फक्त लढ म्हणा
- शहाणपण देगा देवा
- शाळा
- शिक्षणाच्या आईचा घो
- सांगतो ऐका
- साले लोअर मिडल क्लास
- सासू नंबरी जावई दस नंबरी
- हरिश्चंद्राची फॅक्टरी
सत्कार आणि पुरस्कार
- वैभव मांगले यांचा २३-११-२०१० रोजी देवरूखला गावकर्यांनी सत्कार केला होता.
- कलारंग कलागौरव पुरस्कार (२०१३).
- झी मराठी पुरस्कार (’शेजारी शेजारी...” मधील बी.एल. पाठक या विनोदी भूमिकेसाठी)