"वैभव मांगले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वैभव मांगले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. त्यांचे मूळ ग...
(काही फरक नाही)

११:५८, १७ जुलै २०१५ ची आवृत्ती

वैभव मांगले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. त्यांचे मूळ गाव रत्‍नागिरी जिल्ह्यातले देवरूख. त्यांना गाणे शिकायचे होते, मराठीचा प्राध्यापकहीही व्हायचे होते. बी.एस्‌सी. बी.एड. डी.एड.झाल्यावर कोठेही नोकरी मिळेना. म्हणून काकांनी मुंबईला पाठवले. मुंबईत मित्राच्या एका खोलीत दहाबारांज्णांबरोबर राहून नोकरी मिळवायच्या प्रयत्‍नांना सुरुवात केली. त्यावेळी आविष्कार या नाट्यसंस्थेशी संबंध आला, आणि अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. नाटकांमध्ये त्यांनी स्त्री-भूमिकाही केल्या आहेत. ग्रामीण नाटकांमध्ये वैभव मांगले हे कोकणी, मालवणी, वर्‍हाडी या बोलीभाषा सफाईने बोलतात.


वैभव मांगले यांची भूमिका असलेली नाटके

  • एक डाव भुताचा
  • करून गेलो गाव (स्त्री-भूमिका)
  • मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (वैभव मांगले यांचे पहिले नाटक, दिग्दर्शक - परेश मोकाशी)
  • लग्नकल्लोळ
  • वाडा चिरेबंदी

दूरचित्रवाणी मालिका==

  • फू बाई फू (या मालिकेत स्त्री-भूमिकाही होती.)

चित्रपट

  • टाइमपास - १
  • टाइमपास - २