"सुभाष शेकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्रा. डॉ. सुभाष निवृत्ती शेकडे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. गीता... |
(काही फरक नाही)
|
१८:०२, ८ जुलै २०१५ ची आवृत्ती
प्रा. डॉ. सुभाष निवृत्ती शेकडे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. गीता शेकडे या त्यांच्या पत्नी.
बालपण आणि शिक्षण
सुभाष शेकडे यांच्या आई जनाबाई अहमदनगर जिल्ह्यातल्या चिंचपूरला रहात. त्यांच्या कुटुंबाकडे कोरडवाहू जमीनच असल्याने, त्या आणि त्यांच्या वंजारी जातीचे सर्वच जण, ऊसतोड कामगाराचे काम करून उदरनिर्वाह करीत. तशात मोठा भाऊ अचानक वारल्यामुळे जनाबाईंवर धाकट्या भावाची जबाबदारी पडली. माझा धाकटा भाऊ मोठा होईपर्यंत जो माझ्या माहेरी येऊन राहील, त्याच्याशीच मी लग्न करीन, अशी जनाबाईची अट होती. महिंदा गावच्या निवृत्ती शेकडे यांनी ही अट मान्य केली आणि जनाबाईंचे लग्न झाले. त्यांचा मुलगा.सुभाष पाचवीपर्यंत आईच्या माहेरी चिंचपूरला राहून शिकला. तेथे आई-वडील, आजी. एकनाथमामा यांच्यासोबत राहिला. पुढे ते महिंद्याला आले. तेथूनच सुभाष शेकडे मॅट्रिक झाले. कालांतराने त्यांनी पाथर्डीच्या जनता महाविद्यालयातून बी.ए.- एम.ए. केले आणि ते एम.फिल.साठी पुण्यात आले. एम.फिल -पीएच.डी. करताकरताच सुभाष शेकडे पाथर्डीच्या जनता महाविद्यालयात प्राध्यापकीही करू लागले.
कॊलेज शिक्षणाच्या काळात बारावीनंतरच्या प्रत्येक सुट्टीमध्ये सुभाष शेकडे वडिलांबरोबर ऊसतोडीला जात.. त्यांच्या ’हाणला कोयता झालो मास्तर’ या आत्मचरित्रात ऊसतोड कामगारांचे जीवन, त्यांच्या व्यथा, अंधश्रद्धा वगैरेची चांगले वर्णन आले आहे. पुस्तकात ऊसतोडणी क्षेत्रातले शहरी मराठीत नसलेले अनेक शब्द आणि वाक्प्रचारही आले आहेत.
सुभाष शेकडे यांनी लिहिलेली पुस्तके (कंसात प्रकाशनसंस्थेचे नाव)
- आतमधे कीर्तन (दास्ताने रामचंद्र आणि कंपनी)
- झोका (कथासंग्रह - कीर्ती प्रकाशन)
- दळण दळिते दळिते धर्म माझा जागविते (काव्यसंग्रह -)
- भलरी (ललित लेखसंग्रह - दास्ताने रामचंद्र आणि कंपनी)
- विरंगुऴ्याची गाणी (काव्यसंग्रह - A Au An प्रकाशन)
- सुखदुःखाचे सगे सोयरे (काव्यसंग्रह)
- हाणला कोयता झालो मास्तर (आत्मचरित्र - स्नेहवर्धन प्रकाशन)
- ज्ञानबीजाचा विस्तारू (सहलेखक उज्ज्वला जाधव, डॉ.माहेश्वरी गावित) (आनंदोत्सव प्रकाशन मंच)