"नेक चंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नेक चंद(जन्म : शकरगड-पाकिस्तान, १९२४; मृत्यू : चंदीगड, १२ जून, २०१५) ह... |
(काही फरक नाही)
|
२१:१६, १४ जून २०१५ ची आवृत्ती
नेक चंद(जन्म : शकरगड-पाकिस्तान, १९२४; मृत्यू : चंदीगड, १२ जून, २०१५) हे एक वास्तुरचनाकार होते.
चंदीगड येथील रॉक गार्डन
१९५०च्या दशकात नेक चंद चंडिगडमधील एका बांधकाम प्रकल्पावर काम करत होते. त्यावेळी प्रख्यात आर्किटेक्ट ली कोर्बुसिएर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदीगड शहराची निर्मिती सुरू होती. नागरिकांनी फेकून दिलेल्या वस्तूंमधून कलाकृती निर्माण करण्याची कला नेक चंद यांना साध्य झाली होती. यासाठी चदीगडच्या उत्तर भागात त्यांनी स्वत:ची निर्मितीशाळाही तयार केली होती. "रॉक गार्डन‘मध्ये त्यांनी फुटलेल्या बांगड्या, इलेक्ट्रिक बोर्डावरील बटणे, प्लग, ट्यूबलाईट, दगड, फुटलेल्या टाइल्स आणि अशा अनेक टाकाऊ वस्तूंपासून असंख्य कलाकृती निर्माण केल्या आहेत. ३५ एकरामध्ये पसरलेल्या "रॉक गार्डन‘मध्ये धबधबे, तलाव आणि ओपन एअर थिएटरही बांधण्यात आले आहे. १९७६मध्ये "रॉक गार्डन‘चे उद्घाटन झाले होते. ४० एकरांवरील हे गार्डन पाहण्यासाठी भारत आणि जगभरातील अडीच लाखापेक्षा अधिक पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात आणि या गार्डनला तिकिटविक्रीतून वर्षाला सुमारे दोन कोटी रूपयांचा महसूल मिळतो.