Jump to content

"अशोक पाटोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:


[[अनुपम खेर]] यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांचे आहे.
[[अनुपम खेर]] यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांचे आहे.

अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत.


रूपेश पाटोळे हे त्यांच्या मुलाचे नाव.
रूपेश पाटोळे हे त्यांच्या मुलाचे नाव.

अशोक पाटोळे यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक अंत्यसंस्कार न करता त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले.


==अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके==
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके==
ओळ १५: ओळ १९:
* आई तुला मी कोठे ठेवू?
* आई तुला मी कोठे ठेवू?
* आई रिटायर होते
* आई रिटायर होते
* आयजीच्या जीवावर बायजी उदार (एकांकिका)
* एक चावट संध्याकाळ
* एक चावट संध्याकाळ
* एक व्होट हिंदुत्वासाठी (सेन्सॉरबोर्डाने पास न केल्याने हे नाटक रंगमंचावर येऊ शकले नाही)
* एक व्होट हिंदुत्वासाठी (सेन्सॉरबोर्डाने पास न केल्याने हे नाटक रंगमंचावर येऊ शकले नाही)
* कुछ भी हो सकता है (हिंदी; [[अनुपम खेर]] यांचे आत्मकथन)
* चारचौघांच्या साक्षीने
* चारचौघांच्या साक्षीने
* जाऊबाई जोरात
* जाऊबाई जोरात
ओळ ५१: ओळ ५५:


==अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका==
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका==
* चुनौती (हिंदी)
* चुनौती
* श्रीमान श्रीमती (हिंदी)
* श्रीमान श्रीमती
* हसरतें
* हसरतें



०७:१६, ५ जून २०१५ ची आवृत्ती

अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २०१५) हे एक मराठी कथाकार आणि नाटककार होते.

पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती.

चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.

अनुपम खेर यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांचे आहे.

अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत.

रूपेश पाटोळे हे त्यांच्या मुलाचे नाव.

अशोक पाटोळे यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक अंत्यसंस्कार न करता त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले.

अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके

  • अग्निदिव्य
  • आई तुला मी कोठे ठेवू?
  • आई रिटायर होते
  • आयजीच्या जीवावर बायजी उदार (एकांकिका)
  • एक चावट संध्याकाळ
  • एक व्होट हिंदुत्वासाठी (सेन्सॉरबोर्डाने पास न केल्याने हे नाटक रंगमंचावर येऊ शकले नाही)
  • चारचौघांच्या साक्षीने
  • जाऊबाई जोरात
  • ज्वालामुखी
  • झोपा आता गुपचूप
  • तांदूळ निवडता निवडता
  • दांडेकरांचा सल्ला
  • दुर्गाबाई जरा जपून
  • देखणी बायको दुसर्‍याची
  • प्रेम म्हणजे लव्ह असतं
  • बा रिटायर थाय छे (गुजराथी)
  • बे दुणे पाच
  • माणसा माणसा हूप
  • मी माझ्या मुलाचा
  • राम तुझी सीतामाऊली
  • प्रा. वाल्मिकी रामायण
  • श्यामची मम्मी
  • सातव्या मुलीची सातवी गोष्ट
  • हीच तर प्रेमाची गंमत आहे

कथासंग्रह

  • सातव्या मुलीची सातवी मुलगी

कवितासंग्रह

  • पाटोळ्यांच्या पाचोळ्या

अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या मराठी दूरचित्रवाणी मालिका

  • अधांतर
  • अध्यात ना मध्यात
  • झोपी गेलेला जागा झाला
  • हद्दपार (मराठी)
  • ह्यांचा हसविण्याचा धंदा

अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका

  • चुनौती
  • श्रीमान श्रीमती
  • हसरतें

अशोक पाटोळे यांच्या पटकथा, संवाद असलेले चित्रपट

  • चौकट राजा
  • झपाटलेला
  • माझा पती करोडपती

आत्मचरित्र

एक जन्म पुरला नाही