"उदयन काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: उदयन काळे (जन्म : इ.स. १९६०; मृत्यू : पुणे, ३० डिसेंबर, २०१२) हे मराठी र... |
(काही फरक नाही)
|
००:१६, ३ जून २०१५ ची आवृत्ती
उदयन काळे (जन्म : इ.स. १९६०; मृत्यू : पुणे, ३० डिसेंबर, २०१२) हे मराठी रंगभूमीवरचे एक गायक अभिनेते होते. त्यांनी काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकी यांच्याकडेे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांनी भाग घेतलेल्या नाट्यस्पर्धेमध्ये त्यांच्या नाटकाला पहिले तर त्यांना वैयक्तिक रौप्यपदक मिळाले होते.
अभिनेते चंद्रकांत काळे हे उदयनचे थोरले बंधू.
नाट्यसृष्टीत प्रवेश
उदयन काळे हे `आकाशवाणी`च्या दप्तरी `तंबोरा वादक` म्हणून चाकरी करीत. `संगीत शाकुंतल` या नाटकात दुष्यंताची भूमिका ही उदयन काळे यांनी संगीत रंगभूमीवर केलेली पहिली भूमिका होती. त्या भूमिकेत त्यांनीआपल्या आवाजात गायलेल्या पदांनी त्याने रसिकांना मोहवून टाकले. साथीला शकुंतलेच्या भूमिकेत क्षमा वैद्य होत्या.
भरत नाट्य संशोधन मंदिराच्या त्या रंगभूमीवर बाबुराव विजापुरे तालमी घेत. बाबूराव त्या पौराणिक कथानकातला नेमके भाव येण्यासाठी संवाद घटवून घेत. पण पहिल्यांदाच पाऊल टाकलेल्या उदयन काळे यांना त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्यांनीे ती घेतलीही. पुढे तीच मेहनत कामी आली. अनेक नाटकांतून त्यांनीे विविध संगीत भूमिकांना न्याय दिला.
भरत नाट्य मंदिर नाट्यसंस्थेमुळेच उदयन काळे यांना त्यांना शिलेदार कुटुंबीयांच्या "मराठी रंगभूमी’द्वारे नाटकात अभिनयाच्या संधी मिळाल्या. संगीत सौभद्र व स्वयंवरमधील कृष्ण, मानापमानमधील धैर्यधर, मत्सगंधामधील पराशर आणि संशयकल्लोळ मधील अश्विनशेठ या उदयन काळे यांनी केलेल्या काही भूमिका होत.
गाजलेली भूमिका
`लावणी भुलली अभंगाला` मधल्या `निळोबाच्या` भूमिकेने उदयन काळे यांचे नाव सर्वतोमुखी झाले. या नाटकाचे त्यांनी सुमारे दोन हजार प्रयोग केले.
उदयन काळे यांना मिळालेले पुरस्कार
- मराठी नाट्य परिषदेचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- कोरेगाव (सातारा) येथला स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार