"शं.प. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: शंकर परशुराम जोशी (जन्म : इ.स. १८८०; मृत्यू : १६ फेब्रुवारी, १९४९) हे... |
(काही फरक नाही)
|
१९:१७, १९ मे २०१५ ची आवृत्ती
शंकर परशुराम जोशी (जन्म : इ.स. १८८०; मृत्यू : १६ फेब्रुवारी, १९४९) हे एक मराठी नाटककार होते.
खाडिलकर-गडकर्यांच्या पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवरील विनोदी नाटकांनंतर, सामाजिक विषयांवरील विनोदी नाटके लिहून रंगभूमी हसरी ठेवण्याचा प्रयत्न करणार्या नाट्यलेखकांमध्ये शंकररावांचे स्थान फार वरचे आहे. शं.प. जोश्यांना तशी नाटके लिहिण्याची हौस नव्हती, पण त्या काळच्या रंगभूमीची गरज म्हणून ते नाट्यलेखनाकडे वळले. एखादा ज्वलंत सामाजिक विषय घेऊन त्यावर विनोदी पद्धतीने शरसंधान करणे हा त्यांच्या नाटकांचा गाभा होता.
शं.प. जोशी यांनी लिहिलेली नाटके
- खडाष्टक (१९२७)
- संगीत तो आणि ती (१९३९)
- मायेचा पूत (१९२१)
- विचित्रलीला (१९१६)
नाटकांची कथानके
’खडाष्टक’मध्ये लहानसहान गोष्टींवरून तात्त्विक आणि शाब्दिक भांडण करणार्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या नाटकाचे असंख्य प्रयोग झाले आणि आजही होतात.
’तो आणि ती’मध्ये जोशींनी प्रेमभावनेची भली-बुरी रूपे दाखविली आहेत.
’मायेचा पूत’ या नाटकात जोशींनी अनिष्ट व अनैसर्गिक पद्धतीने दत्तक घेण्याच्या रूढीवर हल्ला चढवला आहे.
’विचित्रलीला’त इष्ट सुधारणा कोणत्या आणि अनिष्ट कोणत्या हे विनोदी पद्धतीने व अतिशय मार्मिक स्वरूपात माडले आहे.
शं.प. जोशींच सर्वच नाटके रंगभूमीवर खूप गाजली. त्यांच्या नाटकांत स्वभावनिष्ट आणि प्रसंगनिष्ट विनोदाची जागोजाग कारंजी आहेत. त्यांचे विनोद मूळ उद्देशाला हानी पोहोचवत नाहीत. या नाटकांमधील स्वभावरेखाटनही सुरेख झाले आहे.
गौरव
शंकरराव जोशांची नाटके चारच असली तरी त्यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना रसिक प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले. नाट्यक्षेत्रात काम करणार्या व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे नाट्य संमेलनाध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. इ.स. १९३६ मध्ये पुणे येथे भरलेल्या २८व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.