"ना.रा. बामणगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नारायण रामलिंग बामणगावकर (जन्म : पिसळ-वर्धा जिल्हा, इ.स. १८८१; मृत्... |
(काही फरक नाही)
|
१५:१२, १९ मे २०१५ ची आवृत्ती
नारायण रामलिंग बामणगावकर (जन्म : पिसळ-वर्धा जिल्हा, इ.स. १८८१; मृत्यू : ८ जुलै, इ.स. १९६१) हे एक मराठी लेखक, संपादक, नाट्यपत्रकार, प्रभावी वक्ते आणि नाटककार होते. केसरी, महाराष्ट्र आणि संदेश या वृत्तपत्रांतून त्याचे लेख प्रसिद्ध होते. साप्ताहिक उदय, साप्ताहिक तरुण हिंदू आणि राष्ट्रमत या वर्तमानपत्रांचे ते कधी ना कधी संपादक होते.
बामणगावकर हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारे एक झुंजार पत्रकार होते. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी पुकारलेला वैचारिक संघर्ष हा त्या काळात वैदर्भीय जनतेत असंतोष जागविण्यास कारणीभूत झाला होता. सामान्य लोकांमध्ये जागृती करण्यासाठी नाटकासारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही हे लक्षात आल्यावर बामणगावकरांनी नाट्यलेखन करायला सुरुवात केली. त्यांच्या आत्मतेज आणि धनुर्भंग या दोन नाटकांतले विषय सकॆउत्दर्शनी पौराणिक असले तरी या मिषाने बामणगावकरांना लोकांपुढे सद्यस्थिती समजावून सागण्याचा उद्देश होता. परकीय सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे काम या दोनही नाटकांनी केले.
पत्रकारिता
तरुण हिंदू या साप्ताहिकाद्वारे बामणगावकरांनी आपली पत्रकारिता सुरू केली. या साप्ताहिकांतील लेखांतून ते लोकांना देशप्रेमाचे धडे देत देता इंग्रज सरकारच्या जुलमी सत्तेवर ताशेरे ओढत असत. या साप्ताहिकांतील लेखाबद्दल सरकारने त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांमध्ये बामणगावकरांना १९०७ आणि १९०९ साली दंडाची शिक्षा झाली होती. या शिक्षांमुळे आणि अन्य काही कारणांमुळे त्यांना ’साप्ताहिक तरुण हिंदू’ बंद करावे लागले. साप्ताहिक बंद झाल्यावर बामणगावकर व्याख्यानांद्वारे आपली मते लोकांपुढे मांडू लागले. १९२३ व १९३० साली केलेल्या सविनय कायदेभंगामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
पुढे अमरावतीला आल्यावर बामणगावकरांनी १९३२ साली उदय नावाचा छापखाना काढला. या छापखान्यातून पुरेसा पैसा जमा झाल्यावर त्यांनी छापखान्यातच आपल्या मालकीच्या ’उदय’ नामक साप्ताहिकाची छपाई सुरू केली. १९३६ ’उदय’चा पहिला अंक निघाला.
बामणगाव यांनी लिहिलेली नाटके
- संगीत आत्मतेज
- संगीत धनुर्भंग
- नामदार ए.एस.एस. (नाटिका)
- शिपाई (नाटिका)
सन्मान
नाट्यपत्रकारितेतील त्यांच्या कामाचा गौरव म्हणून ना.रा. बामणगावकर यांना मुंबईत इ.स. १९३३ साली भरलेल्या २६व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान देण्यात आला.